अजय कंडेवार,वणी :- तालुक्यातील मुंगोली ते नकोडा पर्यंत रेल्वे ब्रिजचे गणेश कार्तिकेय प्रायव्हेट,लि. कंपनीचे काम सुरू आहे तरी स्थानिक बेरोजगार यूवकांना आधी प्राधान्य देण्यात यावे ,यासाठी उबाठा गटाचे युवासेनचे उपतालुका प्रमूख आयुष ठाकरे यांनी दि.8.जाने यवतमाळ जिल्हाधिकारी यांना घातले निवेदनाने साकडे घातले.Give first priority to local unemployed youth.
वणी तालुक्यातील मुंगोली या गावापासून चंद्रपूर जिल्ह्यातील नकोडापर्यंत रेल्वे ब्रिजचे काम सुरू आहे. या ब्रिजच्या कामासाठी गणेश कार्तिक प्रा.लि.या कंपनीला टेंडर देण्यात आले आहे. या कंपनीअंतर्गत तीन ते चार कंपन्या असून या कंपनीत कामासाठी परराज्यातील कामगार आणले आहेत. मात्र स्थानिकांना या कंपनीने रोजगार दिला नाही.
या कंपनीत काम करीत असलेल्या कामगारांची पोलिस पडताळणी करण्यात यावी तसेच स्थानिकांना या कंपनीत रोजगार देण्यास प्राधान्य देण्यात यावे, अशी जोरदार मागणी युवा सेनेचे उपतालुकाप्रमुख आयुष ठाकरे यांनी न्याय देण्याची मागणी केली आहे.