Saturday, April 18, 2026
Homeवणीसोयाबीनवर पिवळ्या ‘मोझॅक’चा अटॅक....!

सोयाबीनवर पिवळ्या ‘मोझॅक’चा अटॅक….!

हेक्टरी 1 लाख रु द्या अशी मागणी.

अजय कंडेवार,वणी :- ‘मोझॅक’हा विषाणूजन्य रोग. सोयाबीन पिकाची वाढ ,फुलोरा,आणि शेंगधरणीच्या काळात सोयाबीनवर पिवळ्या ‘मोझॅक’चा अटॅक आल्याने या रोगामुळे अनेक शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.यामुळे तात्काळ पंचनामे करून हेक्टरी 1 लाख रु.द्यावी अशी मागणी वैभव कवरासे (जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा ) यांनी दिं.22 सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनातून तहसीलदार यांचा मार्फत कृषी मंत्री व यवतमाळ जिल्हाधिकारी यांना साकडे घातले आहे.

यंदा मुसळधार पाऊस आणि त्यानंतर पाऊस रखडल्याने आधीच शेती संकटात आली. त्यातच आता सोयाबीन पिकावर पिवळ्या मोझॅक’ रोगाने आक्रमण केले आहे. त्यामुळे वणी तालुक्यातील परिसरातील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पीक या रोगामुळे उध्वस्त झाले आहे. या पिकावर घातक रोगान आक्रमक केल्याने शेतकऱ्यासमोर आणखी मोठ संकट निर्माण झालं आहे. आधीच शेतकरी अवकाळी आणि अतिवृष्टी अशा दुहेरी संकटात सापडला असताना, आता या घातक रोगामुळे बळीराजा चिंतातुर झाला आहे तसेच महाराष्ट्र सरकारने महात्मा ज्योतिबा कर्ज माफी जाहीर केली मात्र या यादीमधून काही शेतकऱ्यांचे नावेच नाही तरी काही शेतकरी अजूनही कर्ज माफीचा लाभ दिलेला नाही तरी येत्या 2 ते 3 दिवसांत याबाबत दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा,अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदन देताना बंडू चांदेकर,पवन एकरे, प्रमोद डाखरे, मनोज केळकर, गणेश डाहुले, गंगाधर परचाके , संजय खाडे व उत्तम धोबे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page