•या आधी वणी पोलीस स्टेशन हद्दीतही अनेक कारवाया.
•”प्रवीण” ने कोणाकडून आणला “तो माल “त्या “भाई”चे नाव कधी उघड ?
•प्रवीणचा मालक कोण ?..की ट्यावू….??
अजय कंडेवार,वणी:-राज्यात गुटखा विक्रीला बंदी असतानाही वणी तालुक्यात खुलेआम गुटखा विक्री सुरू असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. स्थानिक गुन्हे शाखेने ढाकोरीबोरी कडुन येत असणाऱ्या वाहनाला शिरपूर हायवेवर काल (दिं. 25 जुलै) रात्री 8 लाख 47 हजार 350/- रुपये चा रुपयांचा गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त केला असून याप्रकरणी एकास अटक करून त्याविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.Before this many activities in Wani police station limits too. • From whom did “Praveen” bring “that goods” When will the name of that “bhaai” be revealed?
सविस्तर वृत्त, एका इर्टीका कारने सुगंधीत ढाकोरीबोरी कडुन शिरपुर मार्गे येणार असल्याची टीप मिळताच L.C.B वणी-पांढरकवडा विभागाने आभई फाटा वाय पाईन्ट येथे नाकेबंदी करुन मध्यरात्रीचा दरम्यान कार क्रमांक MH-34-AM-2520 चा काr चालकास विचारले. त्याने नाव प्रविण अंबादास गोहकार, (वय 39 वर्ष), रा. शास्त्री नगर वणी, ता. वणी, जि. यवतमाळ असे सांगितले. त्याचा आलिशान कार ची तपासणी केली असता मजा सुगंधीत तंबाखु 200 ग्राम क्षमतेचे 240 नग डबे किंमत 2 लाख 24हजार 400/- रुपये, 2) पांढ-या रंगाचे पोत्यात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला ईगल हुक्का शिशा सुगंधीत तंबाखुचे 200 ग्राम क्षमतेचे 40 नग किंमत 12 हजार 400/- रुपये, 3) पांढ-या रंगाचे पोत्यात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला चार मिनार 333 सुगंधीत तंबाखुचे 30 नग किंमत 5हजार पाचशे पन्नास रू/- व 1 मोबाईल व कार या सर्वाची एकूण किंमत 8लाख 47 हजार 350/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केले. अन्न सुरक्षा अधिकारी शघनश्याम दंदे, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, यवतमाळ यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन आरोपी प्रविण अंबादास गोहकार, वय 39 वर्ष, रा. शास्त्री नगर वणी, ता. वणी, जि. यवतमाळ यांचे विरुध्द पोलीस स्टेशन शिरपुर येथे भादंवि तसेच अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 नियम व नियमाने 2011 चे विविध कलमांन्वये गुन्हा नोंद करण्यात आला .
सदरची कारवाई ही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आदेशाने आधारसिंग सोनोने पो. नि. स्थागुशा यांचा मार्गदर्शनात घनशाम दंदे ( अन्न सुरक्षा अधिकारी) तसेच स्थानिक गुन्हे शाखेने केली.