Ajay Kandewar,वणी :- परिसरातील पुरड (पूनवट) येथे महसूल विभागानं पंचनामा करीत दोन ठिकाणचा जवळपास (अंदाजे) ४० ब्रास अवैध रेतीसाठा दि.१४ मे.रोजी जप्त केला होता. दरम्यान, १९ में रोजी या साठ्यांची पाहणी केली असता ४० ब्रासपैकी १० ब्रास रेती चोरीला गेल्याची धक्कादायक चर्चा गावात उघडकीस आली आहे.

महसूल विभागाकडून पुरड (पूनवट)गावात दोन जागेवरील एकूण जवळपास ४० ब्रास अवैध रेतीसाठा जप्त केला होता.या अवैध रेती साठाचे ढिगारे दि. १६ रोजी दोन ठिकाणावरील वेगवगेळा जागेत जप्त केला होता. पंचनामा करून ताब्यात घेतलें असता 6 दिवस होऊनही त्या स्टॉक च विल्हेवाट लागला नाही.
हा साठा जप्त केल्यानंतर महसूल विभागाचा वरिष्ठांनी पंचनामा सुपूर्द केला परंतू 6 दिवस लोटले आणि शेवटीं जप्तीतीलच रेती गायब झाल्याची जोमात चर्चा पसरली व महसूल प्रशासना विरोधात घरकुल लाभार्थ्यांचा आक्रोश निर्माण झाला. पुरड (पूनवट) गावात R.I व तलाठी यांच्या संशयास्पद भूमिकेने गावात हा प्रकार घडत आहे अशी ही गाव चर्चा आहे. आता तरी या महसूल प्रशासनाने हलगर्जीपणा न करता तात्काळ घरकुल लाभार्थ्यांना रेती वाटप करण्यात यावी अशी आर्त मागणी होत आहे. आता R.I आणि तलाठी काय करतात याकडे सर्व गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

