Ajay Kandewar,Wani:- शहरातील व ग्रामीण भागातील अल्पवयीन मुलांसह तरुणाई मादक पदार्थाच्या विळख्यात सापडली आहे .नशा केल्यानंतर आपण काय करतोय, याचा शुद्ध राहत नसल्याने सुखवस्तू कुटुंबातील मुले गुन्हेगारीत अडकत आहेत.
औटघटकेची नशा एका व्यक्तीलाच नव्हे, तर कुटुंबाला विनाशाकडे नेत आहे.दारू, गांजा, चरस, भांग, अफू, गुंगी आणणारी औषधे, कफ सिरप्स, व्हाईटनरचे थिनर आदी मादक पदार्थांच्या यादीत अनेक नवीन द्रव्यांची भर पडत चालली आहे. हे पदार्थ सेवनाच्या पद्घती वेगळ्यात आहेत. यातील काही पदार्थ सिगरेटमध्ये भरून त्याचा धूर सोडला जातो. काही पदार्थ इंजेक्शन्सद्वारे शिरेत टोचून घेतले जातात, काही तोंडावाटे, तर काही नाकाद्वारे हुंगले जातात. या सर्व पदार्थांचे भयंकर दुष्परिणाम सेवन करणाऱ्या व्यक्तीच्या मनावर, शरीरावर, आर्थिक स्थितीसह कुटुंबावर होतात. आजची तरुणाई मादक पदार्थाच्या विळख्यात चांगलीच अडकली आहे.
तालुक्यातील भालर व राजूर गावातील 16 ते 22 वर्षे वयोगटातील मुले व्यसनाच्या आहारी जाण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. अल्पवयीन मुले वाईट मित्रांच्या संगतीमुळे मादक पदार्थाचे सेवन करीत आहेत. मित्रांचा दबाव व तणाव या पदार्थांबाबत असलेली कुतूहलता, नैराश्यामुळे व्यसन करण्यास सुरुवात होते. शहरातील मुले गांजा व व्हाईटनरच्या आहारी गेले आहे. नशेत त्यांच्या हातून खुनासारखे गंभीर गुन्हे घडले आहेत. गांजा, दारू शहरात व ग्रामीण भागात सहज उपलब्ध होते. मोकळ्या मैदानात बसून ही मुले धूर सोडतात. विशेष गांजा गावात मिळतोय आणि आम्हीं घेतोय अशी अवस्था सध्या राजूर गावात चालली आहे. याकडे पोलीसांनी लक्ष द्यावे अशी मागणी सध्या पालकांकडून होऊ घातली आहे.
•शरीरावर होणारे दुष्परिणाम….
सिगारेट ओढणे, दारू पिणे, गांजा ओढणे, व्हाईटनरची नशा, खर्रा, तंबाखू आदीमुळे दात, घसा, फुफ्फुस, ह्रदय, जठर, मूत्रपिंड, पंचनसंस्थेचे गंभीर आजार होऊ शकतो. कर्करोगाच्या रुग्णांत अलीकडच्या काळात वाढ होत आहे.