•राज्य उपाध्यक्ष इरशाद खान यांच्या नेतृत्वात संघटन बांधणी.
अजय कंडेवार,वणी :- वाहतूकदारांना खंबीर नेतृत्वाची गरज असून त्यांचा विश्वास जपणे ही आपली अत्यंत महत्वाची प्राथमिक जबाबदारी आहे. सामाजिक बांधिलकीच्या जाणीवतेने राज ठाकरे यांना अभिप्रेत असणारी वाहतूक सेना उभारणार असा मानस बाळगून सर्वांनी कार्य करण्याचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे राज्य सरचिटणीस आरिफ शेख यांनी केले. काल वणीत आयोजित करण्यात आलेल्या वाहतूक सेनेंच्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
लोकसभा विधानसभा निवडणुका जवळ येऊन ठेपल्याने राजकीय पक्षांच्या अनेक नेत्यांचे सध्या दौरे सुरू आहेत. या दौऱ्यात संघटनात्मक बांधणी, उमेदवार आदींचा आढावा घेत आहेत. त्यातच मनसेने कधीही मागे राहत नाही. प्रत्येक दिवशी मनसे नवनवीन कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम घेऊन जनतेच्या सेवेत असते. त्यात भर देत आता मनसेने आपला मोर्चा वाहतूक कडे वळवला आहे. मतदारसंघांतील वाहतूक क्षेत्रांतील वाहन चालक मालक यांना एकसंध करत पक्षाची ताकद वाढविण्याच्या अनुषंगाने राज्य उपाध्यक्ष इरशाद खान यांच्या नेतृत्वात संघटन बांधणी करण्यात येतं आहे. याचाच एक भाग म्हणुन काल मतदार संघातील वणी आणि मारेगाव येथे वाहतूक सेनेच्या शाखेची स्थापना करण्यात आली. या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी राज्य सरचिटणीस आरीफ शेख उपस्थित होतें
यावेळी वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इर्शाद खान यांच्या नेतृत्त्वात आरिफ शेख यांचे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. तर राळेगाव, वडकी, मारेगावं व वणी शहरात वाहतूक सेनेच्या शाखा स्थापन करण्यात आल्या. या शाखांचे उद्घाटन आरिफ शेख यांच्या हस्ते करण्यात आले. तर विवीध वाहन चालक व मालकांना संघटनेच्या विवीध पदांचे नियुक्तीपत्र देतं त्यांना या पदाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. तर अनेक युवकांनी यावेळी मनसेत पक्ष प्रवेश केला. या वाहतूक सेना शाखांच्या माध्यमातून वाहतूकदारांच्या प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना केल्या. त्याचबरोबर यंदा वणी विधानसभा मतदारसंघात मनसेचा झेंडा फडकवण्यासाठी सर्वांनी सज्ज राहण्याचे आवाहन केले. प्रसंगी मनसे वाहतूक सेनेंचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान, माजी आरोग्य सभापती धनंजय त्रिंबके , महीला जिल्हाअध्यक्षा अर्चना बोधाडकर, अब्दुल साजिद, शंकर वरघट, फाल्गुन गोहोकार,आजिद शेख, शम्स सिद्दीकी, रुपेश ढोके, गजानन मिलमिले, सचिन येलगंधेवार, शिवराज पेचे, शुभम भोयर, इरफान सिद्दिकी, विशाल रोगे, संतोष चिटलावार, आकाश दुधकडे, सय्यद युनूस, रोशन शिंदे,सुरज काकडे आदी उपस्थित होते…