Vidarbh News ,Wani :-विदर्भातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आवाज, राज्याचे पक्ष नेते राजू उंबरकर यांचा वाढदिवस वणी विधानसभा मतदारसंघात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. लहान मुलांपासून, तरुण-तरुणी, महिला भगिनी आणि वयोवृद्ध नागरिकांपर्यंत सर्वांच्याच डोळ्यांत दिसणारे हे प्रेम पाहून मी भारावून गेलो. सरतेशेवटी धन, संपत्तीचा हव्यास क्षुल्लक असून हा लोकांचा आपल्यावर असणारा लोभ हीच खरी संपत्ती असल्याची जाणीव नव्याने झाली. येत्या काळात ही संपत्ती शतगुणीत होवो, असे प्रतिपादन राजू उंबरकर यांनी कार्यक्रमावेळी केले .
विदर्भातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विविध शाखेत सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून शुभेच्छा देण्यात आल्या. महिला सेनेच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने वृक्षरोपण, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप असे सामाजिक उपक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वाढदिवसानिमित्त विदर्भासह वणी विधानसभा क्षेत्रात राबवले. मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि वणी शहरातील जनतेच्या वतीने जोरदार फटाक्याच्या आतिषबाजीसह वणी विधानसभा क्षेत्रात राबवले. मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि वणी शहरातील जनतेच्या वतीने जोरदार फटाक्याच्या आतिषबाजीसह रात्री शिवतीर्थावर वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी मनसे सैनिकांनी राजू उंबरकर यांचे अभिष्टचिंतन करत त्यांना शुभेच्छा दिल्या..