Ajay Kandewar,Wani:- तालुक्यातील राजूर गावा तील हातपंप दुरुस्तीकडे अक्षरशः तीन महिन्यापासून सांगूनही कोमात असलेले ग्रा. पं.प्रशासन काणाडोळा केल्याने, हे हातपंप कधी दुरुस्त होतील, असा प्रश्न गावातील नागरिकांना पडला आहे. हे हातपंप तात्काळ दुरुस्त करावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच नवीन विराजमान झालेले सचिव यांनी कार्यालयात खुर्चीवर बसण्यापेक्षा गाव फेरफटका मारून गाव समस्या जाणून घ्याव्यात असेही जनमानसातून बोलल्या जात आहे.
फेब्रुवारी महिन्याचा दुसरा आठवडा उलटून गेला आहे. दिवसेंदिवस उन्हाची दाहकता वाढत आहे. वाढत्या उन्हामुळे भूगर्भातील पाणी पातळी खालावली आहे. तालुक्यात काहीं ठिकाणीं निम्म्याहून अधिक गावांमध्ये गंभीर पाणीटंचाई जाणवू लागली आहे. शासनाने पाणीटंचाई दूर करण्यासाठी गेल्या काही वर्षांत टप्याटप्यांने तालुक्यातील गावातील प्रत्येक वाड्या वस्त्यांवर विंधन विहिरी खोदून त्यावर हातपंप बसविले. सुरुवातीच्या काळात हे हातपंप व्यवस्थित चालले मात्र त्यानंतर देखभाल दुरुस्ती होत नसल्याने अनेक हातपंप बंद पडले आहेत. बरेचसे हातपंप हे गेल्या कित्येक महिन्यांपासून नादुरुस्त आहेत. अनेक विनावापर राहिल्याने बरेच हातपंप गंजून गेले आहेत. बऱ्याच हातपंपाला चांगले पाणी होते, मात्र ते नादुरुस्त झाल्यावर त्यांकडे नंतर कुणीही फिरकले नाही.हातपंप सुरू असले की, गावकऱ्यांना दिलासा मिळतो. हातपंपाच्या देखभाल दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतीकडून वार्षिक शुल्क आकारले जातात. तरीही शासन हातपंपांच्या दुरुस्तीकडे काणाडोळा का करीत आहे, असा प्रश्न सर्वसामान्य नागरीकांना पडतो. “विशेषतः वॉर्ड क्र.4 मधील समय्या कोंकटवार यांच्या घरासमोरील हातपंप बाबत तेथील नागरिकांनी स्वतः आवर्जुन ग्रामपंचायतला दुरुस्ती करून देण्याबाबत तोंडी माहिती दिली तर त्यांनी आश्वासने देखिल दिली ती आश्वासने फुस्स होतांना दिसून आले.कारण तो हातपंप तुटून पडून आहे त्यातील चैन देखिल तुटलेल्या अवस्थेत असल्याने ते आज रोजी लहान बाळासाठी घातक ठरत आहे.” मागील 3 महिने झाले सांगून तरीही राजूर ग्रां. पं. किती जागृत आहे .हे आता तरी सांगायची गरज नाहीच यावरून त्यांचा भोंगळ सहज लक्षात येते . गावात फरफटका मारून जरा गावातील समस्यांकडे लक्ष द्यावे व ते वॉर्ड क्र.2,3,4 चे हातपंप तात्काळ दुरुस्त करुन लोकांना उपयोगी आणुन द्यावे. अशी मागणी होऊ घातली आहे .
“राजूर ग्रा.पं. ही 17 सदस्यीय आहे. आज रोजी गावचा विकास हा व्याख्याने जोगता असला पाहिजे होता. परंतु ” जो कोणी निवडूण येतो सरपंच बनतो आणि गावसमस्या जैसे थे” चा स्थितीत आणून सोडतो. विकासाचा नावाखाली अनेकांनी मते घेतलें परंतु विकास कुणाचा हे आता तरी लोकांना या सदस्यांनी आणि सरपंच यांनी सांगू नये”असा आरोप गावकरी करताहेत.