Tuesday, February 27, 2024
spot_img
spot_img
Homeचंद्रपूरसरकारच्या अधिसूचना/ मसुद्याने ओबीसी समाजावर अन्याय होणार नाहीच : डॉ. अशोक जीवतोडे

सरकारच्या अधिसूचना/ मसुद्याने ओबीसी समाजावर अन्याय होणार नाहीच : डॉ. अशोक जीवतोडे

•अधिसूचना/मसुद्यावर ज्यांना हरकती घ्यायच्या त्यांनी त्या नक्की घ्याव्यात .

अजाय कंडेवार,वणी: राज्य सरकारने दि. २५ व २६ जानेवारीला मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा- कुणबी, व कुणबी -मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्यासंबंधात नोंदी तपासून कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत अधिसूचना/ मसुदा काढला आहे. या अधिसुचनेवर १६ फेब्रुवारी पर्यंत हरकती मागविल्या आहेत.ओबीसी समाजात या अधिसूचनेमुळे संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र सदर अधिसूचना व सद्यपरिस्थिती समजून घेणे आवश्यक आहे.

राज्य सरकारने दिनांक २५ व २६ जानेवारीला प्रसिध्द केलेल्या कागदपत्रानुसार अधिकृतपने राज्यात आतापर्यंत २० जानेवारी २०२४ अखेर पर्यंत ५७ लाख ४१ हजार २४१ कुणबी नोंदी सापडल्या. त्यापैकी संपूर्ण राज्यात ३८ लाख ९७ हजार ३९१ कुणबी लोकांना प्रमाणपत्र वितरित केल्या गेले. म्हणजे एका घरचे पाच-पाच पकडून २ कोटी लोकांना प्रमाणपत्र दिल्या जाईल असा विषय मांडल्या जात आहे. मात्र ह्या सर्व कुणबी नोंदी जुन्याच असून नव्या नोंदी खूप अल्प आहेत.

पूर्व विदर्भात म्हणजे नागपूर विभागात ९,४२,२०८ कुणबी नोंदी सापडल्या त्यापैकी ८,७४,८३७ कुणबी प्रमाणपत्र वितरीत केले. तर अमरावती विभागात २६,१५,२२७ कुणबी नोंदी सापडल्या त्यापैकी १०,६६,३३१ कुणबी प्रमाणपत्र वितरीत केले. ज्या ठिकाणी मराठ्यांचे कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी आंदोलन सुरू आहे, त्या छत्रपती संभाजी नगर विभागात कुणबी प्रमाणपत्रची नोंद असलेले ३२,०९१ आहे त्यापैकी २३,२९० कुणबी प्रमाणपत्र वितरीत केले गेले आहे. या विभागामध्ये सन १९८६ ते २३/१०/२०२३ पर्यंत २३६३ कुणबी नोंदी होत्या व २४/१०/२०२३ नंतर म्हणजे शिंदे समिती स्थापनेनंतर आजपर्यंत मराठवाड्यात २०,९२७ नवीन नोंदी सापडल्या अशा एकूण २३,२९० एव्हढी कुणबी जात प्रमाणपत्र वितरीत केली. व हे प्रमाण देखील कमीच आहे, निजामशाहीतील रेकॉर्ड आज उपलब्ध नाही, अथवा रेकॉर्ड नष्ट झाल्यामुळे तेथील कुणब्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही त्यामुळेच मनोज जारांगे यांनी आंदोलन सुरू केले होते, व हीच मराठा आरक्षण आंदोलन सुरू होण्याची खरी गोम आहे.

पुणे विभागात ६,०७,६१९ पैकी ७७,७३३ वितरीत ,कोंकण विभागात ७,५३,०५६ कुणबी नोंदीपैकी ६,७९,०४८ प्रमाणपत्र वितरीत केले गेले.नागपूर विभागात ९,४२,२०८ कुणबी नोंदी आहे. ८,७४,८३७ कुणबी प्रमाणपत्र वितरीत केले. ही सध्यस्थिती २० जानेवारी २०२४ अखेर पर्यंतची आहे.

कुणबी नोंदी ज्या मराठा व्यक्तीच्या आढळतील त्यांना पितृसत्ताक कुटुंब पद्धतीप्रमाणे सगेसोयरे यांची जूनिच व्याख्या नव्याने मांडून कुणबी प्रमाणपत्र देण्याचे या अधिसूचनेत नमूद आहे,नवीन अधिसूचनेचा विचार करता आधीचे नियम बघावेच लागेल, वडील आजोबा किंवा पणजोबा,खपरपांजोबा यांच्या महसूली/शैक्षणिक कागदावर जर कुणबी जातीची नोंद नियमानुसार असेल तर त्या व्यक्तीच्या कुटुंबातील वडीलाकडील नातेवाईकांना नियमानुसारच कुणबी प्रमाण पत्र मिळते.

सगे सोयरे शब्द नव्याने समावेश करून जुने शब्द तसेच ठेवले आहे. जातीमधील झालेल्या सजातीय लग्न संबंधातून निर्माण झालेले रक्त संबंधातील नातेवाईक अशानाच कुणबी प्रमाणपत्र मिळेल.नोंद मिळालेल्या नागरीकांच्या रक्त नात्यातील किंवा पितृसत्ताक नात्यातील लोकांना प्रमाणपत्र मिळेल.हे सर्व जुनेच नियम आहेत.केवळ आणि केवळ शब्दांचा खेळ करून संभ्रम निर्माण केला गेला आहे.या अधिसूचनेत नवीन असे काहीच नाही, सध्याच्या प्रचलित पितृसत्ताक पध्द्तीनेच कुणबी प्रमाणपत्र मिळेल.

आईकडील जातप्रमाणपत्राचा संबंध म्हणजे मातृसत्ताक पध्दतीचा उल्लेखच या मसुद्यात नाहीच.आता पर्यंत जो आकडा सांगितला तो चुकीचा नसून त्यापैकी अनेकांकडे आधीचेच कुणबी प्रमाण पत्र आहे. हे नवीन कुणबी लोक नाही. जुनेच लोक आहेत.त्यांच्या नोंदीदेखील जुन्याच आहेत.

शिंदे समिती (२४/१०/२३) स्थापने नंतर फक्त २० हजार प्रमाणपत्र मराठवाड्यात प्रदान केले गेले. व ते देखील तपासूनच दिल्या गेले आहे,त्या दिलेल्या प्रमाणपत्रावर अजूनही कोणती तक्रार नाहीच व अजून एकाचीही जात वैधता झालेली नाही. ती करतांना देखील समाजकल्याण अधिकारी सर्व निकष, नियम बघूनच करतील. निकषाप्रमाणे जात वैधता पुनश्च तपासल्या जाते. नोंदी निकषानुसार असेल तरच त्यांना जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येते.

५७ लाखांहून अधिक नोंदी सापडल्या ज्या की जुन्याच कुणबी लोकांच्या आहेत, तडकाफडकी त्या नव्याने टाकलेल्या नाहीत, त्या आजच्या नाहीत. त्यामुळे ओबीसी लोकांवर अन्याय होत नाहीच.तरीदेखील या अधिसुचनेवर/मसुद्यावर १६ फेब्रुवारी पर्यंत हरकती मागविल्या आहेत, त्यानुसार ज्यांना हरकती घ्यायच्या आहेत, त्यांनी अभ्यास करूनच हरकती नक्की घ्याव्यात, असे आवाहन डॉ. अशोक जीवतोडे यांनी केले आहे.

- Advertisement -
spot_img

मागील बातमी देखील वाचा :-

Rajur

“मायशा” ला प्रेटिएस्ट हेअर अवॉर्ड ….

अजय कंडेवार,वणी:-राजूर येथील व्यावसायिक फैजल खान यांची कन्या मायशा .ही ड्रीम्झ प्ले स्कूल नर्सरीची विद्यार्थिनी आहे.मुंबई येथे झालेल्या ज्युनियर मिस...
Read More
वणी वणीवार्ता

मनोज जरांगे यांचा जाहीर निषेध : डॉ. अशोक जीवतोडे

अजय कंडेवार, वणी:- मराठा समाज आंदोलक मनोज जरांगे यांचा जाहीर निषेध भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष...
Read More
Breaking News वणी वणीवार्ता

प्रशांत येसांबरे यांचे अल्पशा आजाराने निधन….

•गावातील उच्चशिक्षित व उत्तम स्वभावाचा युवक हरपला. अजय कंडेवार,वणी:- तालुक्यातील राजुर कॉ येथील अभिमन्यू येसांबरे यांचा लहान मुलगा प्रशांत अभिमन्यू...
Read More
Breaking News क्राईम वणी वणीवार्ता

चोरट्या मार्गाने मध्यरात्रीपर्यंत बार सुरू अन् जोरदार राडा….!

•परस्परविरोधात ठाण्यात गुन्हे दाखल. •त्या बार विरोधात कारवाई होईल का ? एक्साइज विभाग मुंग गिळून अजय कंडेवार,वणी:- शहरातील वरोरा रोड...
Read More
Breaking News वणी वणीवार्ता

“शेतकरी आक्रोश मोर्चा” तहसीलवर धडकला…..

•आ.प्रतिभाताईंचा बैलगाडी मोर्चा ठरला लक्षवेधी. अजय कंडेवार,वणी:-शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे हतबल झाला आहे. प्रशासनाकडून त्यांच्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेतली जात नाही....
Read More
Breaking News वणी वणीवार्ता

वणीचा शंकरपटात  “ही ” जोडी विजेता….!

•सजय खाडे यांच्या संकल्पनेंतून सामान्यजनतेनी अनुभवला ऐतिहासिक क्षण. अजय कंडेवार,वणी:- विविध रंगी, देखण्या आणि चपळ बैलजोड्या हवेच्या वेगाने निर्धारित १००...
Read More
Breaking News पाटण वणी

अवघ्या काही तासात लावला चोरीचा छडा…!

•पाटण पोलिसांची उल्लेखनिय कामगिरी . •बैलजोडी परत मिळाल्याने शेतकऱ्यास गहिवरून आले. अजय कंडेवार,वणी:- पाटण शिवारातील बंडयाचे कुलूप तोडून गोठ्यात बांधून...
Read More
Breaking News वणी वणीवार्ता

आज “वणी शंकरपटाचा” विजेता ठरणार…..!

•जत्रा मैदानात अलोट अश्या गर्दीची शक्यता,पोलिसांचा चोख बंदोबस्त. •26 वर्षानंतर प्रथमच वणीत प्रेक्षक ऐतिहासिक क्षण अनुभविणार. अजय कंडेवार,वणी:- संजय खाडे...
Read More
वणी वणीवार्ता

नियम धाब्यावर बसवून कोळसा वाहतूक … 

•प्रदूषणाचा भस्मासूर बोकाळलाय.... अजय कंडेवार, वणी :-  वणीत कोळशाच्या नियमबाह्य वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. वणी -यवतमाळ मार्गावर चिखलगाव...
Read More
वणी

वणीत भरउन्हात शेतकर्‍यांसह प्रेक्षकांचा शंकरपटाला उदंड प्रतिसाद…..

•पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक 30 बैलजोड्या उपस्थित •आज विदर्भाच्या कानाकोपर्यातील बैलजोड्याचे आगमन अजय कंडेवार,वणी : शहरात 26 वर्षानंतर प्रथमच आयोजित करण्यात...
Read More
Breaking News क्राईम वणी

पोलिसांना गुंगारा देणारा “आजम ” अटकेत…

•वणी पोलिसांनी दुर्गापूर येथून केली अटक अजय कंडेवार,वणी:- गेल्या ८ महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून पसार झालेल्या आरोपीला वणी पोलिसांनी...
Read More
वणी वणीवार्ता

ओबीसींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागू दिला नाही; राज्य सरकारचे अभिनंदन – डॉ. अशोक जीवतोडे

अजय कंडेवार,वणी:- राज्यातील मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10% आरक्षण देणारे विधेयक आज दोन्ही सभागृहात महाराष्ट्र विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात...
Read More
वणी वणीवार्ता

शिवजयंती निमित्त “सत्या ग्रुप ” तर्फे रक्तदान शिबिर….

अजय कंडेवार,वणी :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सत्या ग्रुप तर्फे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. "ग्रुपचे युवकवर्ग एकत्रित येऊन...
Read More
वणी वणीवार्ता

भुरकी येथील जि प.शाळेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती….

अजय कंडेवार,वणी:- 19 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भुरकी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे...
Read More
वणी वणीवार्ता

गावाकडे चला; गाव समृध्द तर देश समृद्ध : डॉ. अशोक जीवतोडे

•जय बजरंग बली पदावली भजन मंडळ तथा समस्त ग्रामवासी बाळापूर तर्फे भव्य पदावली भजन स्पर्धा संपन्न.. अजय कंडेवार,वणी : केंद्र...
Read More
वणी वणीवार्ता

वणी येथे ‘रस्ता सुरक्षा अभियान’…..!

•वाहतुकीच्या नियमांबाबत अत्यंत मोलाचे मार्गदर्शन. अजय कंडेवार,वणी:- रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त नागरिकांमध्ये वाहन नियमांची जनजागृती व्हावी,  मोटार वाहन अपघाताला परिणामकारकरित्या आळा...
Read More
वणी वणीवार्ता

वणीत संयुक्त किसान मोर्चा व माकप चे वतीने निदर्शने

•दिल्ली येथे भाजपचा मोदी सरकारकडून शेतकऱ्यांवर अमानुष निषेध •एसडीओ यांना मागण्यांचे निवेदन विदर्भ न्यूज डेस्क,वणी : भाजपचा मोदी सरकार कडून...
Read More
वणी वणीवार्ता

संचालक : उत्सव सेलिब्रेशन लॉन अॅन्ड मंगल कार्यालय मांगरूळ ,संचालक : लोढा मल्टीस्पेशालीस्ट हॉस्पिटल, वणी मारेगांव, म.रा.प्रदेश काँग्रेस कमेटी सदस्य, डॉ. महेंद्र लोढा साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🥳🥳🥳

संचालक : उत्सव सेलिब्रेशन लॉन अॅन्ड मंगल कार्यालय मांगरूळ ,संचालक : लोढा मल्टीस्पेशालीस्ट हॉस्पिटल, वणी मारेगांव, म.रा.प्रदेश काँग्रेस कमेटी सदस्य,...
Read More
Breaking News वणी वणीवार्ता

“त्याने ” घेतला बेडशिटच्या साहाय्याने गळफास….

•वणी येथील घटना. अजय कंडेवार,वणी:- शहरातील गुरूनगर परिसरात  घरी वास्तव्यास असलेल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ता.१६ फेब्रु,...
Read More
वणी वणीवार्ता

सामाजिक बांधिलकीच्या जाणीवतेने राज ठाकरे यांना अभिप्रेत असणारी वाहतूक सेना उभारणार – आरिफ शेख

•राज्य उपाध्यक्ष इरशाद खान यांच्या नेतृत्वात संघटन बांधणी. अजय कंडेवार,वणी :- वाहतूकदारांना खंबीर नेतृत्वाची गरज असून त्यांचा विश्वास जपणे ही...
Read More
{"dots":"true","arrows":"true","autoplay":"true","autoplay_interval":3000,"speed":600,"loop":"true","design":"design-1"}

संपादक

अजय संजय कंडेवार

'विदर्भ न्युज' हे आपल्या परिसरात घडणाऱ्या घडामोडीवर कटाक्ष ठेवणारं न्युज पोर्टल आहे. आपल्या परिसरात घडणाऱ्या घटना बे-धडक, निष्पक्ष, निर्भयपणे वाचकांसमोर मांडणार आहोत. संपादक म्हणून कार्य करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार असला तरी बातमीचा मतितार्थ सहजसोप्या पद्धतीने मांडण्याचा आम्ही प्रयत्न करणार असून हेतुपुरस्सर बातमी लिखाण, समाजात कोणाचीही मानहानी होईल असे कृत्य आम्ही करणार नाही. मला पत्रकारितेत मागील पाच वर्षाचा अनुभव असून आघाडीच्या वृत्तपत्र समूहात बातमीदार म्हणून काम केले आहे तर सध्यस्थीतीत. वाचकवर्गाचं प्रेम हीच खरी उपलब्धी असून 'विदर्भ न्युज' हे सदैव आपल्या सेवेत तत्पर राहणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

संपादकीय चमू

अजय संजय कंडेवार
संपादक
+91 855036501
spot_img
spot_img
spot_img

“मायशा” ला प्रेटिएस्ट हेअर अवॉर्ड ….

अजय कंडेवार,वणी:-राजूर येथील व्यावसायिक फैजल खान यांची कन्या मायशा .ही ड्रीम्झ प्ले स्कूल नर्सरीची विद्यार्थिनी आहे.मुंबई येथे झालेल्या ज्युनियर मिस इंडियाच्या टॉप 5 मध्ये...

मनोज जरांगे यांचा जाहीर निषेध : डॉ. अशोक जीवतोडे

अजय कंडेवार, वणी:- मराठा समाज आंदोलक मनोज जरांगे यांचा जाहीर निषेध भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अशोक जीवतोडे यांनी...

प्रशांत येसांबरे यांचे अल्पशा आजाराने निधन….

•गावातील उच्चशिक्षित व उत्तम स्वभावाचा युवक हरपला. अजय कंडेवार,वणी:- तालुक्यातील राजुर कॉ येथील अभिमन्यू येसांबरे यांचा लहान मुलगा प्रशांत अभिमन्यू येसांबरे यांचे अल्पशा आजाराने निधन...