•” या ” ग्रामपंचायतीत घडलय हा प्रकार.
अजय कंडेवार,वणी :- ग्रामपंचायत सदस्यांच्या अधिकारचे हनन केल्यामुळे सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी , याकरिता राजूर ग्रा.पं.सदस्या बबीता सिंह यांनी गटविकास अधिकारी वणी यांना बुधवार दिं.24 मे.रोजी निवेदनातून साकडे घालण्यात आले.The member’s rights are being violated. This type of thing happened in the Gram Panchayat.
सविस्तर,बबीता रामेश्वर सिंह, वॉर्ड क्र. ६ ग्रा.पं. सदस्या राजुर आगामी दिनांक 24/05/2023 च्या मासिक सभेची कोणतीही नोटिस जाणीवपूर्वक देण्यात आली नाही, स्त्री मुंबई ग्रामपंचायत अधिनियमानुसार हे हनन आहे. ग्रामसभेचा अध्यक्ष हा सरपंच असतो आणि सचिव हेही या सभेचा महत्वाचा गाभा मानला जातो काहींना नोटीस देणे व एकाला न देणे हा प्रकार एकदा नाहीं तर दोनदा झाला असे प्रकार घडने हे कार्यालयीन कामात निंदनीय आहे. ग्रामपंचायतीत यापूर्वी सुद्धा हा प्रकार घडला असून सुचविलेल्या कोणत्याही विकास कामाची अंमलबजावणी ग्रामपंचायत कडून होत नसते असाही खळबळजनक आरोपही निवेदनातून ग्रा.सदस्या बबितातर्फे करण्यात आला आहे.
या गंभीर विषयाची दखल वरिष्ठांनी घ्यावी आणि सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी निवेदनातून केलेली आहे.
यावेळी निवेदन देताना प्रणिता मो.अस्लम, छोटू मीलमिले, मो.अस्लम हे होते.