Ajay Kandewar,वणी :- विधानसभेचे आमदार संजय देरकर आज तारीख ७ फेब्रुवारी रोजी रात्री शिबला ता. झरिजामनी येथील आदिवासी आश्रम शाळेत चिमुकल्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या स्वतः जाणून घेणार आहे. त्याच ठिकाणी आपला तंबू ठोकून मुक्कामी असणार आहे. त्यासाठी सर्व प्रशासन कामी लागले आहे. महाराष्ट्र शासनाच्या संवाद चिमुकल्यांशी अभियान या महाराष्ट्र शासनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प महाराष्ट्र शासन मंत्रालय आदिवासी समाजाचे लोकप्रतिनिधी, मंत्रालयीन अधिकारी शुक्रवार दि.०७. फेब्रुवारी, २०२५ रोजी राज्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये किंवा आदिवासी वसतीगृहामध्ये जाउन विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी, समस्या जाणून घेण्यासाठी मुक्कामी थांबणार आहेत. यात वणी विधानसभेतील शिबला येथील आश्रम शाळेत आमदार संजय देरकर हे थांबणार आहे.