अजय कंडेवार,वणी :- शहरातील एका 35 वर्षीय युवकाने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. संतोष खेडेकर वय 35 वर्षे रा.सेवानगर वणी असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकी काय आहे घटना :
वणी येथिल सेवानगर येथील संतोष खेडेकर उर्फ संत्या (वय 35 वर्षे) हे सकाळी शेतात गेला व तेथे काहीतरी विषारी पदार्थ पिऊन आत्महत्या केली. ही घटनेची माहिती मिळताच गावातील नागरीक देखील घटना स्थळाकडे घाव घेतली. व त्या विषप्राशन केलेल्या व्यक्तीला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असता त्याला डॉक्टरने मृत घोषित केले.आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली असावी का ? की, काही आणखी बाब असेल ? असा कयास उपस्थित नागरीक लावत होते.
याबाबत वणी पोलिसात अकास्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ग्रामीण रुग्णालयात शव पोस्टमार्टम साठी ठेवण्यात आलें.पोस्टमार्टम होताच शव नातेवाईकांना देण्यात येणार आहे.

