Ajay Kandewar, Wani :- विधानसभेमध्ये आपल्या आर्थिक संपन्नतेच्या जोरावर ठाकलेल्या उमेदवारांच्या व्यक्तिमत्त्वाची चर्चा होत आहे. तर दुसरीकडे विकासाच एकच नाव संजू भाऊ नावाने चर्चेत असलेल्या संजय देरकर यांनी मात्र विधानसभा मतदारसंघांमध्ये चांगला जोर धरला आहे. तिन्ही तालुक्यात पार पडलेल्या सभेमध्ये मतदारांची जमलेली गर्दी पाहून विधानसभा मतदारसंघात परिवर्तनाची नांदी ठरवणारी असल्याचे मतदारांकडून बोलल्या जात आहे.
गेल्या अनेक वर्षात देरकर यांनी सामाजिक सह राजकीय कार्यक्रमांमध्ये आघाडीवर राहून मतदारांशी नाळ जोडून ठेवलेली आहे. याचाच फायदा या निवडणुकीत शिवसेनेला होणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे. आजवरच्या निवडणुकांत संजय देरकर हे नेहमी आघाडीवर राहिलेले आहे. अनेक मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असून यावेळी मारेगाव,वणी व झरी तालुक्यात संजय देरकर आघाडीवर असतील हे निश्चित.