•अनेकांचा उपस्थितीत सोहळा संपन्न
अजय कंडेवार, वणी:- श्री. स्वामी नरेंद्र महाराज पादुका दर्शन सोहळ्यात खासदार बाळुभाऊ धानोरकर व माजी आमदार वामनराव कासावार यांचा उपस्थिती संजय खाडे अध्यक्ष, रंगनाथस्वामी अर्बन निधी लि.वणी यांचे तर्फे आर्थिक दुर्बल महिलांसाठी खासदार सुरेशभाऊ धानोरकर व माजी आमदार वामनराव कासावार यांचा हस्ते महिलांना शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले.
श्री. स्वामी नरेंद्र महाराज यांच्या पादुका दर्शन सोहळा दिनांक १२ नोव्हेंबर २०२२ ला वणी येथे एस. बी. लॉन संपन्न झाला. या सोहळयात हजारोंच्या संख्येने परिसरातील भाविक व यवतमाळ व चंद्रपुर जिल्हयातील भाविकभक्त मोठया संख्येने उपस्थित होते. यामध्ये संजय रामचंद्र खाडे अध्यक्ष रंगनाथस्वामी अर्बन निधी लि,वणी यांनी स्वखर्चाने शिलाई मशिन घेऊन दिल्या व श्री. बाळुभाउ धानोरकर खासदार चंद्रपुर / वणी / आर्णी लोकसभा क्षेत्र तसेच श्री. वामनराव कासावार माजी आमदार वणी विधानसभा क्षेत्र यांच्या हस्ते आर्थिक दुर्बल गरजू महिलांसाठी ६०,५००/- रू किंमतीच्या शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले.त्याबदद्ल सर्व महिलांनी त्यांचे खूप आभारही मानले.
याप्रासंगी संजीवरेड्डी बोदकुरवार (आमदार, वणी विधानसभा क्षेत्र) तारेद्र बोर्डे (माजी नगराध्यक्ष)
देविदास काळे, टिकाराम कोंगरे, रवि बेलूरकर, राजाभाऊ पाथ्रडकर, प्रमोद वासेकर, शंकर वराटे, पूरूषोत्तम आवारी, जयकुमार आबड, धनश्याम पावडे, विनोद गोडे, गजानन खापणे, अशोक धोब, रविद्र धानोरकर, साधना गोहोकार, साधना ठाकरे, राजेंद्र कोरडे, अशोक नागभिडकर, सर्वांची मोठया संख्येने उपस्थिती होती व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येनी उपस्थित होते.