•कायर येथील जि.प.उच्च प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट सहभाग….
•बेटी बचाव” हा मुद्दा मुलींनी अतिशय ठासून मांडला
अजय कंडेवार,वणी:- कायर येथील जि.प.उच्च प्राथमिक शाळेच्या वेळापत्रकानुसार दिनांक 19 ऑक्टोबरला संकलित चाचणी संपली असता दिवाळीच्या सुट्ट्या 22 ऑक्टोबर पासून असल्याने वादविवाद स्पर्धेच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ते आज रोजी 21 ऑक्टोंबरला अतिशय उत्साहपूर्वक वातावरणात सम्पंन झाले.
या वादविवाद स्पर्धेत शाकाहार श्रेष्ठ की, मांसाहार श्रेष्ठ,मुलगी श्रेष्ठ की, मुलगा श्रेष्ठ पहिल्या विषयानुसार मांसाहार सर्वांना हवाहवासा वाटतो. म्हणून तोच आहार श्रेष्ठ कसा असे काही मुद्दे विद्यार्थ्यांनी मांडले.ते मुद्दे खोडून काढताना मानवाची शरीर रचना व दातांची रचना शाकाहारी प्राण्यात मोडते व शाकाहार पचनास हलका आहे. असे मुद्दे मांडून शाकाहारच श्रेष्ठ आहे, हे मुद्दे मांडण्यात आले. शेवटी जीवने सरांनी शाखाहार श्रेष्ठ कसा हे सर्वांना निकालांती समजावून सांगितले.
दुसरा मुद्दा मुलगी श्रेष्ठ की, मुलगा श्रेष्ठ यात शाळेत सरळ सरळ मुलांची व मुलींची असे दोन गट पडले पण अगदी खेळीमेळीच्या वातावरणात मुद्दे मांडण्यात आले.”बेटी बचाव” हा मुद्दा मुलींनी अतिशय ठासून मांडला व सर्वांना भावुक केले. आज प्रत्येक क्षेत्रात मुलगी प्रगती करीत आहे असे मुद्दे मांडले.तर मुलांनी मुलींचे मुद्दे खोडतांना सांगीतले की,शारीरिक दृष्ट्या ईश्वरांनीच पुरुष जातीला वजन, उंची, व उर्जा यात श्रेष्ठ करून पाठविले. त्यामुळे मुलेच श्रेष्ठ आहेत असा युक्तिवाद केला.
यावर मुख्याध्यापक शेकन्ना भिंगेवार यांनी मुलगा व मुलगी ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जसे निसर्गतः चुंबकाचे एस. व एन धृव विजातीय एकत्र येतात पण सजातीय एकत्र येऊ शकत नाहीत ते एकमेकापासून दूर जातात.तसेच दोन भावंडे किंवा जसे दोन बहिणी, जेवढे मिळून राहतात त्यापेक्षा एक भाऊ व एक बहीण यांच्यात जास्त समज असते व मिळून मिसळून राहतात.”बेटी बचाव” हा मुद्दा आता सर्वांच्या ध्यानात आला आहे .कारण अनेक समाजात आज पुरुषांचे लग्न करायला वधू मुलगी मिळत नाही. त्यामुळे मुलांची व मुलींची संख्या समसमान पाहीजे ही काळाची गरज आहे.फक्त जीवन जगताना मुला मुलीने उत्तम शिक्षण घेवून, स्वावलंबी बनून जीवन जगल्यास जीवनात अडथळे येणार नाहीत.असा निर्णय मुख्याध्यापक शेकन्ना भिंगेवार यांनी दिला.
या उपक्रमासाठी शाळेतील शिक्षिका कुमुदिनी देवतळे, ज्योत्स्ना मानकर,विना अरोडा, रंजना तुपे, कीर्ती कुलकर्णी,स्रृतिका फटाले व लहू आत्राम यांनी मुला-मुलींना योग्य मार्गदर्शन केले.