•”त्या ” मध्यस्थी समाजसेविकेचाही डॉ. लोढा यांनी डाव उधळला.
•पैश्याचा मागणीचा नादात बाळाला जंतू संसर्ग व कोणतीही विशेष ट्रीटमेन्ट न घेतल्याने शेवटी बाळ दगावला पत्रकार परिषदेत आरोप.
•”विदर्भ न्युज पोर्टल” ने आधी प्रकाशित केले वृत्त… अन् उघड
अजय कंडेवार,वणी:- नवजात बाळ प्रकरणी चौकशी समिती व न्यायप्रविष्ट असतांनाही सतत डॉ.महेंद्र लोढा यांना “या” प्रकरणातील काहीजण सतत पैश्याची मागणी करून मानसिक त्रास देणे अश्या “एका ऑडियो क्लीपचा” माध्यमातून डॉ. लोढा यांनी (दि.2 सप्टेंबर) शनिवार रोजी “द वसंत जिनींग हॉल ” येेथे पत्रकार परिषद घेत एक आपबिती पत्र व अनेकांनी खंडणी मागितली असल्याचे खळबळजनक पुरावेही पत्रकार परिषदेत सादर केले.Conspiracy, Defamation, Threat and Blackmailing.Dr. “that” mediating social worker. Lodha foiled the ploy.
भाग्यश्री नरेंद्र बुजाडे या वणीतील कनकवाडी येथील रहिवासी आहे. 28 जुलै रोजी त्यांची वणीच्या ग्रामीण रुग्णालयात प्रसूती झाली. मात्र प्रसूती झालेल्या बाळाचे काही अवयव अविकसित होते. डॉ. लोढा यांनी सोनोग्राफी केल्यानंतर बाळाच्या वाढीबाबत माहिती दिली नाही. त्यामुळे अवयव विकसीत न झालेले बाळ जन्माला आले, असा आरोप पालकानी केला होता.
गुरुवारी दिनांक 30 ऑगस्ट रोजी नवजात बाळाचा मृत्यू झाला. पोस्टमॉर्टम नंतर बाळाच्या नातेवाईकांनी लोढा हॉस्पिटलसमोरच मृतदेह ठेवले. अखेर शुक्रवारी दि. 1 सप्टेंबर पासून बाळाच्या नातेवाईकांनी तहसील कार्यालयासमोर उपोषणही सुरु केले परंतु उपोषणाचा दुसऱ्या दिवशीच ” विदर्भ न्युज” ला मिळालेले काही ऑडिओ क्लिप्स चा माध्यमातून ” या”प्रकरणातील काही महत्वाचा बाबी जनतेसमोर आणण्याचे मौल्यवान कार्य केलें त्यामाध्यमातून डॉ. लोढा यांनी “विदर्भ न्युज “ची ऑडिओ क्लीप ची बातमी प्रकाशित होताच ते वृत्त बघून अवघ्या 3 तासातच “एका वणीतील सोशल मीडिया ग्रूपवर” आपबिती काही ऑडिओ क्लिप्स व या प्रकरणातील मनोगत व्यक्त करताच वणी उपविभागात खळबळच उडाली. या प्रकरणातील सत्य विदर्भ न्युज चा माध्यमातून काही प्रमाणात बाहेर आले. परंतु असे अनेक पुरावे विदर्भ न्युज ने गोळा केले आहे .वेळ येताच ते देखील समोर आणले जाण्याचा दावाही केला आहे. विशेष या प्रकरणात “ती”एक समाजसेविका कोणाचा माध्यमातून हवेत उडण्याचे काम करीत होती ते सत्य अवघ्या काही दिवसात उघड होणारच. त्यात काहींही शंकाच नाही.
माझे माय बाप (समस्त नागरिक) आपली साथ हवी आहे….. – डॉ. महेंद्र लोढा.
“गेल्या 20 वर्षांपासून मी वैद्यकीय सेवा देत आहे. प्रत्येकाचे शरीर वेगळे असते त्यामुळे रुग्ण हा वेगळा असतो. बाळाच्या केसबाबत मी इन्टरनॅशनल जर्नल वाचले असता. त्यात लाखातून एक असा रुग्ण असल्याचे नमुद आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरु आहे. तपासात जो काही निकाल येईल तो मला मान्य राहणार आहे. मात्र कोणताही निकाल येण्याआधीच माझी बदनामी करणे, खंडणी मागणे, ब्लॅकमेलिंग करणे, चौकात माईक घेऊन गरळ ओकणे हे योग्य नाही.
डॉक्टरांमुळे आजपर्यंत अनेकांचे जीव वाचले आहे. मात्र तेच कठिण वेळी डॉक्टरांवर हल्ला करण्यासही मागेपुढे पाहले जा नाही. या प्रेशरमध्येच सर्व डॉक्टर जगतात. आज मी कुठलीही चूक नसताना बदनामी सहन करीत आहो. माझ्या ऐवजी एखादा दुसरा डॉक्टर असता आणि त्याच्याकडे असे खंडणी मागण्याचे, बदनाम करण्याचे प्रकार झाले असते तर तो हे सहन करू शकला नसता. असा प्रकार मी दुस-या कुठल्याही डॉक्टरसोबत होऊ देणार नाही. या प्रकरणात मी खंडणी उकळण्याचा व माझी बदनामी केल्याचा गुन्हा दाखल करणार आहे. जे कुणी काहीही माहिती नसताना वाहत्या पाण्यात हात धुवून घेत आहे. या प्रवृत्तीविरोधात लढण्याचे मी ठरवले आहे. अशा प्रवृत्ती जागीच ठेचल्या पाहिजे. यात मला आपली साथ हवी आहे. ” – डॉ. महेंद्र लोढा, वणी.