सुरेंद्र इखारे,वणी – येथील श्री विश्वकर्मा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . या वेळी संकल्प केल्यानुसार मंडळातील सर्व कार्यकर्त्यांनी उत्साहाने रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष श्री विजयभाऊ मुकेवार यांच्या हस्ते करण्यात आले होते .
रक्तदान शिबिरात डॉक्टरांनी केलेल्या सहकार्याबद्दल मंडळाचे वतीने मोमेंटो देऊन गौरविण्यात आले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी शुभम झिलपे , अभय गटलेवार, रितिक झिलपे , रितेश साखरकर, दिनेश साखरकर, राजीव साखरकर, अनुप वांढरे , पवन गटलेवार, सुहास झिलपे , मयूर झिलपे , किशोर झिलपे, उमेश झिलपे , रूपक अंड्रस्कर , कल्पक अंड्रस्कर , मनीष बुरडकर , निखिल झिलपे, ओम उपरे आदींनी परिश्रम घेतले.