•रंजल्या गांजल्यासाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले आयुष्य वेचले- अध्यक्ष देविदास काळे.
अजय कंडेवार,वणी:- भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 67 वा महापरिनिर्वाण दिन अशातच या महामानवास श्री.रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड.देविदास काळे यांचा हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णांकित पुतळ्यास हारार्पण करून विनम्र अभिवादन केले.
‘शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा’, असा संदेश डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण भारत वासीयांना दिला. सोबतच भारताची राज्यघटना सुद्धा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून भारतात लोकशाही प्रस्थापित केली. त्यांच्या विषयी संपूर्ण देशात सद्भावना असून आजच्या दिवशी म्हणजेच 6 डिसेंबर 1956 ला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा दिल्लीत निधन झाले. दरम्यान अख्खा देश हळहळला.
या महामानवास मानवंदना करतांना श्री.रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड.देविदास काळे,उपाध्यक्ष विवेकानंद मांडवकर, संचालक लिंगारेड्डी अंडेलवार ,सीईओ संजय दोरखंड व कर्मचारीवर्ग उपस्थित होते.