Sunday, May 17, 2026
HomeBreaking Newsशेतात वीज पडली अन् शेतकऱ्याचा श्रमाच सोनं जळाला....

शेतात वीज पडली अन् शेतकऱ्याचा श्रमाच सोनं जळाला….

Ajay kandewar,Wani : तालुक्यातील मोहदा या गावात मंगळवारी रात्री ८ चा सुमारास झालेल्या पावसासह विजेच्या कडकडाटामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. विजेचा प्रचंड कडकडाट होऊन देवराव पिंटू मोहितकर यांच्या शेतात वीज कोसळली आणि तेथील अंदाजे ५०० कापसाचे जाळे क्षणात जळून खाक झाले.

या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकरी आपल्या शेतात कामानिमित्त असताना हा अनर्थ घडला परंतु जीवितहानी टळली. अचानक लागलेल्या आगीत काही मिनिटांतच सर्व जाळे भस्मसात झाले.घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांचा समूह घटनास्थळी दाखल झाले.शेतकऱ्याने या नुकसानीसंदर्भात शासनाकडे पंचनामा करून भरपाईची मागणी केली आहे. स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी तात्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page