•चिखलगाव येथील घटना.
अजय कंडेवार वणी:– तालुक्यातील चिखलगाव येथे एका शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली.The farmer took a sip of poison.Incident at Chikhalgaon.
सविस्तर वृत्त,पांडुरंग रामचंद्र सातपुते वय (48) असे मृतकाचे नाव आहे. दि.31 मे. ला पहाटेच्या सुमारास विष प्राशन केल्याची माहिती मिळताच परिवारातील सदस्यांनी तात्काळ वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले. मात्र नशिबाला काही वेगळच मान्य होत.त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतकाचा आईचा नावाने चिखलगाव येथे शेतजमीन असुन ते शेतीचा व्यवसाय करुन कसाबसा उदरनिर्वाह करीत होता. त्याचा अश्या जाण्याने घरातील कर्ताच निघून गेल्याने परिवारावर जणू काही दुःखाच डोंगरच कोसळला.
त्याच्या पश्चात आई,पत्नी व दोन मुले असा आप्त परिवार आहे. शेवटचा टोकावरील पाऊल का उचलले? अद्यापही कारण गुलदस्त्यात आहे. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.