Thursday, May 15, 2025
Homeवणीशेतकऱ्यांसाठी जाहीरनामा नव्हें...तर माझा 'वचननामा'.....!

शेतकऱ्यांसाठी जाहीरनामा नव्हें…तर माझा ‘वचननामा’…..!

•"जनेतेचे आमदार" संजय खाडे यांचे "लिखित" "8 वचने..." •वणी मतदारसंघासाठी "हटके"अपक्षाचा वादा.

Ajay Kandewar,Wani:- वणी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वचननामा सादर केला. या वचननाम्यात तडफदार अपक्ष उमेदवार संजय खाडे यांनी ८ वचनं दिली आहेत. वणी विधानसभेतील अपक्ष उमेदवार संजय खाडे यांनी वचननामा जाहीर करताना म्हटलं की, महाविकास आघाडी व महायुतीच्या जाहीरनाम्यातली बरीचशी वचनं या वणी विधानसभेसाठी दिसली नाहीं पण याशिवाय इतर काही मुद्दे ज्याकडे आम्हाला लक्ष द्यावं वाटतं अशा मुद्द्यांचा यात समावेश आहे. या अपक्ष उमेदवाराचा वचननामा वणी विधानसभा निवडणुकात एक वेगळाच प्रभाव पाडणारा दिसुन येत याची सर्वत्र चर्चा देखिल जोमात सूरू आहे. हा वचननामा सामान्य जनतेचा बाबी जसे शेतकरी,युवक, उद्योग, महिला, प्रदूषण मुक्त शहर, माझ्या शब्द, पायाभूत सुविधा या बाबीकडे संजय खाडे यांनी विशेष लक्ष दिलें आहे.

   : संजय खाडे यांचा हाच तो विकास वचननामाः

१.शेतकरी :-प्रत्येक गावात शेतीच्या विकासासाठी पक्के पांदण रस्ते तयार करणार, पिकाला हमीभाव (कापूसः १२०००/- प्रती क्विंटल, सोयाबीन: १००००/- प्रती क्विंटल) मिळण्यासाठी विधानसभेत आवाज उठवणार, सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळण्यासाठी प्रयत्न करणार शेतीसाठी दिवसा १२ तास अखंडित वीज पुरवठा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार, शेतकऱ्यांना शेतीपूरक जोडधंदा उपलब्ध करून देणार.

२.युवक :-“युवक तिथे व्यायामशाळा” युवकांसाठी प्रत्येक गावात व्यायाम शाळा बांधणार, वणी, झरी व मारेगाव तालुक्यात क्रीडा संकुले सर्व सोयी सुविधांनी अद्यावत करणार, युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार.

३.महिला :-महिला बचत गटांना स्वयंपूर्ण बनविणार, महिला कौशल्य विकासावर भर देणार, महिला सुरक्षेवर व शिक्षणावर विशेष लक्ष देणार.

४.माझा शब्द :-वेकोली प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या उर्वरित जमिनी संपादित करून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार, तीनही तालुक्यात MIDC च्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणार, स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार, कायमस्वरूपी चालतं- फिरतं जनहित केंद्र उभारणार.

५.उद्योग :-मोठा दुग्ध उद्योग उभारुन दुग्ध व्यवसायाला चालना देणार, मोठा कापड उद्योग उभारून कापूस पिकाला भाव मिळवून देणार तसेच नवीन रोजगार निर्मिती करणार, महिला स्वयंरोजगारास चालना देणार, MIDC उद्योग विकासाकडे विशेष लक्ष देणार.

६.शिक्षण :-“गाव तिथे अभ्यासिका”, प्रत्येक गावात सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज अभ्यासिका बनवणार, नियमित करिअर मार्गदर्शन सत्रे राबवणार, आदिवासी व ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणावर विशेष लक्ष केंद्रित करणार.

७.पायाभूत सुविधा :-प्रत्येक गावातील अंतर्गत रस्ते करणार, रस्त्याच्या दोन्ही कडेला भूमीगत, हवाबंद गटारे, गावातील प्रत्येक वार्डात सार्वजनिक शौचालय बांधणार,नियमितपणे स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणार.

८.प्रदूषण मुक्त शहर :-वणी ला प्रदूषण मुक्त करणार, तिन्ही तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून शहराचे सौंदर्याकरण करणार.

हाच विकासाचा जनतेचा आमदाराचा.. मनातील भाव व्यक्त करीत जनतेसाठी बनविण्यात आलेला वचननामा बनविण्यात आला आहे. याच वचननाम्याचे वणी विधानसभेत चर्चा प्रत्येक घरोघरी पोहोचत आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments