जि .प. सेस फंड योजनेअंतर्गत लाभ घेण्याचे आवाहन.
सुरेंद्र इखारे,वणी – कृषी विभाग पंचायत समितीने वणी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना जिल्हा परिषद सेस फंड योजने अंतर्गत 2022-23 मधील बियाणे व खत-किट खरेदीच्या 5000 रुपये रकमेच्या मर्यादेत अनुदान द्यावयाचे असल्याने इच्छुक शेतकऱ्यांनी आपला अर्ज दिनांक 16 सप्टेंबर पूर्वी सादर करावा.


या अर्जा सोबत खालील कागदपत्रे जोडावी जसे 7/12 नवीन मुळपत्र, 8 अ नवीन मुळपत्र, बियाणे व खाते/ कीटकनाशक फवारणी किट खरेदीची विहित परिमानासह जी एस टी क्रमांकाची पावती मुळपत्र झेरॉक्स प्रत, बँकेच्या खाते पुस्तकाची खाते क्रमांक व आय एफ एस सी कोडसह सुस्पष्ट स्व साक्षांकित झेरॉक्स प्रत, आधार कार्ड झेरॉक्स प्रत जोडण्यात यावे परंतु 16 सप्टेंबर नंतर येणाऱ्या अर्जाचा स्वीकार होणार नाही, असे आवाहन गटविकास अधिकारी पंचायत समिती यांनी केले आहे.


