• कायर येथे पोलिसांचा रूट मार्च ……
अजय कंडेवार,वणी:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिन व शिरपूर पोलीस स्टेशनचा हद्दीत होणाऱ्या आगामी निवडणूकीचा पार्श्वभूमीवर वणी उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर ठाणेदार गजानन करेवाड नेतृत्वात दिनांक 5 डिसें,सोमवार रोजी शिरपूर पोलिसांनी रुट मार्च व पथसंचलन केले.
शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील परिसरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिन व कायर गावात होणाऱ्या निवडणूकीचा पार्श्वभूमीवर शांतता राहावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये ,याबाबत दक्ष राहत पोलिसांनी महत्वाच्या रस्त्यावरुन हा रुट मार्च काढला.ग्रामपंचायत निवडणूक कालावधीत कुठल्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही व निवडणूक शांततेत पार पाडाव्यात याबाबत शिरपूर ठाणेदार गजानन करेवाड यानी सूचना दिल्या .
सदर रूट मार्च व पथसंचलनाला अधिकारी ,पोलिस कर्मचारी व होमगार्ड असे सोबत होतें .या गावात पोलीसांचा रूट मार्च काढून आगामी येणाऱ्या निवडणूक संदर्भातही गावचा आढावा घेण्यात आला .