विदर्भ न्युज,Wani:- मागील 10 दिवसांपासून सहाय्यक अभियंता यांची बदली झाली आहे व साखरा फिटर मध्ये लाईनमन नाही.विशेषतः पावसाळ्याला सुरवात झाली आहे .अश्या परिस्थितीत विज ग्राहकांना नाहक त्रास होत आहे.त्यासाठी शिरपूर उपकेंद्रात सहाय्यक अभियंता व साखरा फिटर मध्ये लाईनमन तात्काळ रुजू करण्याकरिता युवासेना वणी विधानसभा समन्वयक आयुष ठाकरे यांनी कार्यकारी अभियंता (म.रा.वि.वि. कं.म. पांढरकवडा) यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

मागील 10 दिवसांपासून सहाय्यक अभियंता यांची बदली झाली आहे व साखरा फिटर मध्ये लाईनमन नाही. यातून निष्काळजीपणा स्पष्ट दिसत आहे. शेतकऱ्यांना सुद्धा A/G फिटर ची लाईन अजून सुद्धा बनलेली नाही. मनुष्यबळाचा तुटवडा आहे हे आपल्या कृतितुन दिसून राहिले आहे .परंतु काही दिवस लाईन न येणे हा कुठला प्रकार आहे. मान्य आहे नैसर्गिक आपती झाली कि नुकसान होत ते नागरिक समजून घेतील पण सहाय्यक अभियंता कार्यालय मध्ये रुजू होणार नाही लाईनमन राहणार नाही त्याचे दूरध्वनी बंद असले मग न्याय देणार कोण?? आपण या सर्व बाबी लक्षात घेता जनतेच्या होणारा त्रास समजून आपण यावर तोडगा काढावा, अन्यथा जनहितासाठी शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला.
•वणी येथील कार्यालयात लागलेला फलक.. वाचा….
“आमच्याकडे आलेले ग्राहक हे फार मोलाचे आहेत ग्राहक हे आमच्यासाठी नसून आम्ही ग्राहकांसाठी आहोत ग्राहक हे आमच्या कामामध्ये व्यत्यय नसून ते आमच्या कामाचा गाभा आहेत ग्राहक कोणी परके नसून खऱ्या अर्थाने आमचे आधारस्तंभ आहेत त्याची सेवा करून आम्ही त्याच्यावर उपकार करीत नाही तर सेवा करण्याची संधी देऊन तेच आम्हाला उपकृत करीत आहेत.”

