•5 लाख 12 हजार रु. मुद्देमाल जप्त
अजय कंडेवार,वणी:- तालुक्यातील शिरपूर हद्दीत चारगाव चौकी या मार्गावर वणीतून केल्या जाणाऱ्या दारु वाहतुकी विरोधात शिरपूर पोलिसांनी कारवाई केली.या कारवाईत किंमत 12 हजार 960 रु दारू मिळून आली व दारु वाहतुकीसाठी वापरलेली कार कि. 5 लाख रु असा एकूण 5 लाख 12 हजार 960 रू मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी राजू मारुती अलिवर रा. गायकवाड नगर , वणी व शेख आरिफ शेख इब्राहिम याच्यावर कारवाई करण्यात आली. परंतु यात 1 अटकेत तर दुसरा पसार होण्यात यशस्वी झाला.ही कारवाई ता.14 जाने.दुपारचा सुमारास करण्यात आली.याबाबत अधिक माहिती अशी की, वणीतून शिंदोलाकडे दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती शिरपूर पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली होती. त्यानुसार शिरपूर ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली चारगाव चौफुली येथे सापळा रचला होता.
शिरपूर पो. स्टे.हद्दीत चारगाव चौकी या मार्गावर वणीतून केल्या जाणाऱ्या दारु वाहतुकीला थांबून विचारपूस केली असता कार क्र.MH-29-AR-1638 या वाहनात 72 नग आर.एस.कंपनीच्या विदेशी 180 मिली क्षमतेच्या कि.रु 12 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी दोघांवर याच्यावर कलम 65 (अ)( ई) म.दा.का 109 भा.द.वी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदरची कारवाई शिरपूर पोलिसांनी केली आहे.