विदर्भ न्युज,वणी :- जय श्रीकृष्ण जन्माष्टमी समिती वणीच्या विद्यमाने भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध ठिकाणी मोफत नेत्र चिकित्सा व मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम मारेगाव येथील सुविधा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले होते ते अतिशय व्यवस्थितरित्या संपन झाले.
येत्या 4 सप्टेंबरला सायं. 6 वाजता येथील शासकीय मैदानावर सुप्रसिद्ध भजन गायिका शहनाज अख्तर यांची भजन संध्या रंगणार आहे. समस्त श्रोत्यांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जय श्रीकृष्ण जन्माष्टमी समिती, बजरंग दल यवतमाळ जिल्हा व विश्व हिंदू परिषदेने केले आहे.