• समाजाचं काहीतरी देणं लागत म्हणून नृसिंह व्यायाम शाळेला आर्थिक मदतही.
अजय कंडेवार,वणी:- येथील नृसिंह व्यायाम शाळा फार जुनी असून या संस्थेने अनेक उपक्रम राबवून नावलौकिकही मिळवले आहे. व्यायाम शाळा ही आरोग्य हीच धन संपदा आहे कारण शरीर सुदृढ असेल तर मन सुदृढ असते तरच आपण सर्वच क्षेत्रात काम करू शकतो असे श्री रंगनाथ स्वामी अर्बन निधी वणीचे अध्यक्ष संजय खाडे यांनी “नृसिंह व्यायाम शाळेत” दिवाळीनिमित्त लक्ष्मीपूजन आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विचार व्यक्त केले.
या लक्ष्मीपूजन कार्यक्रमाचा प्रसंगी श्री.रंगनाथ स्वामी अर्बन निधी वणीचे अध्यक्ष संजय खाडे यांच्या नृसिंह व्यायाम शाळेच्या लाठीकाठी व कबड्डी चमुनी पुष्पगुच्छ देऊन संजय खाडे व त्यांचे चिरंजीव धनंजय खाडे यांचा महाराष्ट्र संस्कृतीनुसार जंगी सत्कार केला. समाजाचं काहीतरी देणं लागत म्हणून संजय खाडे यांनी नृसिंह व्यायाम शाळेला देणगी स्वरूप म्हणुन 21 हजार रुपयांची रोख रक्कम दिली.
यावेळी नृसिंह व्यायाम शाळेचे अध्यक्ष प्रमोदभाऊ इंगोले, सचिव पुरुषोत्तम आक्केवार, सहसचिव पांडुरंग ताटेवार, कोषाध्यक्ष रमेश उगले, संचालक दिलीप येमुलवार, रमेश शर्मा, विलास आसुटकर, सूर्यकांत मोरे, कन्हैया पारखी, नरसिंह भाई पटेल, इब्बू शेख, मुन्ना शेख, राजकुमार मोरे, प्रेम मेश्राम, देवा राठोड, कुणाल ठोंबरे, यश काकडे, सुजल गाडगे, फैय्याज अली, सय्यद समीर, बंडू निंदेकर, वैष्णवी चामुलवार, कु आयु उगले, अण्वि इंगोले, गौरी पिदूरकार, संकेत आक्केवार, सागर डोंगरे, समीर सय्यद, कु छकुली वाढई, राज जमदाडे, डॅनिश पठाण, दुशांत आवारी, माई बोढे, श्रावणी आवारी, डिंपल बदखल, काजल गाडगे, शीतल आडे, बोढे, दोडके उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचे आभार सूर्यकांत मोरे यांनी मानले तर कार्यक्रमाचा यशस्वीतेकरीता नृसिंह व्यायाम शाळेच्या सदस्यांनी सहकार्य केले.