•कुटुंबासहित आर्थिक सहाय्य व फळ वाटप.
अजय कंडेवार,वणी:- ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’ या साने गूरूजीच्या उक्तीप्रमाणे व्यर्थ खर्चाला फाटा देत, ज्याही धनदांडग्या लोकांनी किंवा अडचण होते इ.कारणामूळे काहींनी वृद्ध मायबापाला रस्त्यावर सोडले आणि या सर्वांना फाट्यावर मारत या वृद्धांचे आशिर्वाद घेवून ,त्यांना मायेचा पदर,आपूलकी ,घरातल्या सारखा नव्हे पण त्याहून आधिक मायेची ऊब देणारे आणि या सर्वांचेच बाजीराव महाराज नावाचे एक वृध्दाश्रम……. यांचा पालकत्वाची जिम्मेदारी खांद्यावर पेलत वणीसारख्या ठिकानी अध्यक्ष सुहास नांदेकर यांनी वृद्धाश्रम सारखा झाड त्यांनी लावले. अश्या पवित्रस्थळी संजय रामचंद्र खाडे अध्यक्ष रंगनाथ स्वामी अर्बन निधी लिमिटेड वणी तसेच संचालक वसंत जीनिंग वणी यांच्या वाढदिवसानिमित्ताने कुटुंबासहित विविध कार्यक्रमाचे आयोजन दि.23 मे. रोजी करण्यात आले. Celebrating Sanjay Khade’s birthday in the old age home, cutting wasteful expenses.
या कार्यक्रमात बाजीराव महाराज वृद्धाश्रम पळसोनी या वृद्धाश्रमात जाऊन कुटुंबासहित वृद्ध महिला व पुरुषांना फळ वाटप करून त्यांना सांत्वना व आधार दिला त्या वृद्धाश्रमाला आर्थिक मदत करीत त्या निरागस वृद्धांचा सन्मान करण्यात आला.विविध क्षेत्रात गरीब गरजू लोकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत व सहकार्य केले यानंतर सुद्धा वृद्धाश्रमाला मदत करत राहू असे त्यांच्या वतीने आश्वासन देण्यात आले.
अश्या सामाजिक उपक्रम कौतुकाचे उद्गार काढून त्यांच्या कार्याची प्रशंसा करीत वृद्धाश्रमाचे अध्यक्ष सुहास नांदेकर यांनी सुद्धा संजय खाडे यांचे मनपूर्वक आभार मानले.