Thursday, May 14, 2026
Homeवणीवे.को.ली विरोधात मनसेचा एल्गार.........

वे.को.ली विरोधात मनसेचा एल्गार………

•जर वेकोली मागण्या पूर्ण करणार नाही तर महाराष्ट्र नवनिर्माणसेनेचा खळकट्यात आपणास बघावयास मिळेल – राजू उंबरकर ( राज्य उपाध्यक्ष, मनसे)

अजय कंडेवार,वणी :- वे. को.ली खाणीमुळे जनजीवन धोक्यात आले निवेदनात विविध मागण्या असुन त्यावर त्वरीत तोडगा काढण्याकरीता राजु उंबरकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसहित क्षेत्रिय महामुख्यप्रबंधक, वणी नॉर्थ एरिया यांना आज दिनांक 5 डिसेंबर 2022 सोमवार रोजी निवेदन देण्यात आले.

गेल्या अनेक वर्षेपासुन वे कोली ने मनमानी कारभार चालविला आहे. त्यामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आता तर त्यामध्ये भर पडुन नागरीकांना स्वतः चा जिव गमवावा लागत आहे. हयाचे प्रमुख कारण वे कोली ने नियम बाह्य काम करण्याची पध्दत कारणीभुत ठरत आहे व या सर्व बाबीस आपण स्वतः जवाबदार आहात, आपणास शेवटची विनंती करतो की, आपण केलेल्या (ऑस्ट्रेलियन बाबुळ) ची झुडपे त्वरीत नष्ट तरी करण्यात यावी. जेणेकरून जनतेचा आरोग्यास विपरीत परिणाम होणार नाही. सोबतच नरभक्षक वाघासोबत इतरही प्राणी मानव जिवित्याला धोका निर्माण करणार नाही, पुनर्वसनाचा विषय त्वरीत मार्गी लावुन जनतेस न्याय दयावा. वे. को. ली च्या प्रदुषणामुळे शेतीचे पिकाचे नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यास त्वरीत मोबदला देण्यात यावा. सोबतच वे.को. ली विभागात असणाऱ्या स्थानिकांना सर्व प्रथम रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात यावी. वाघाचे वास्तव्य असणाऱ्या गावांना वनविभागाला सोबत घेऊन गावा गावामध्ये रक्षक देण्यात यावे. गावातील महिलांनकरिता रोजगारच्या सुविधा पुरविण्यात याव्या. गावात व गावालगत पथदिव्याची व्यवस्था त्वरीत करण्यात यावी. त्याचप्रमाणे रस्त्याची दुरावस्था याकडे लक्ष केंद्रीत करून रस्त्याची कामे त्वरीत हाती घेण्यात यावी. प्रदुषण विभागाने दिलेल्या नियमाचे काटेकोर पालन करण्यात यावे. वेकोली अंतर्गत शिक्षण घेण्याऱ्या विद्यार्थ्यांना त्वरीत बस सुविधा पुरविण्यात यावी. वे.को.ली अंतर्गत दत्तक असणाऱ्या गावांना संपुर्ण सुविधा देऊन विकास कामे करण्यात यावी.

वणी लगत असणाऱ्या रेल्वे साईडिंग मुळे होणारे प्रदुषण थांबवावे अथवा रेल्वे साईडिंग वणी पासुन दुर करण्यात यावी. सदर बाबीची पुर्तता त्वरीत करण्यात यावी असे न झाल्यास वे.को. ली विरोधात तिव्र आंदोलन छेडण्यात येईल. या आंदोलना दरम्यान कायदा व सुव्यवस्था बादीत झाल्यास आपण स्वतः जबाबदार राहाल असा इशाराही राजु उंबरकर यांचा निवेदनातून केला आहे.

निवेदन देताना राजु उंबरकर (राज्य उपाध्यक्ष, मनसे), फाल्गुन गोहोकर ( ,वणी तालुका अध्यक्ष), शिवराज पेचे (वणी,शहर अध्यक्ष) व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page