•चालकाकडून नियमाचे सर्रास उल्लंघन. तरीही प्रशासन गप्प?
अजय कंडेवार,वणी :- वेकोलिच्या वणी क्षेत्रातील कोळसा खाणीतून दररोज हजारो टन कोळ्शाची वाहतूक केली जाते. ही वाहतूक करताना कोळशावर ताडपत्री बांधली जात नाही. त्यामुळे प्रचंड धूळ उडत असून रस्त्यावरुन चालणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनचालकांचा जीव धोक्यात आला आहे.ओव्हरलोड व ताडपत्री न झाकता कोळशाची वाहतूक करणाऱ्या ट्रकमालकावर कारवाई का केली जात नाही.Transportation of thousands of tons of coal without license plate.Frequent violation of rules by the driver. Still the administration is silent?
ओव्हरलोड वाहतूक करण्याबरोबरच ट्रकवर ताडपत्री बांधणे बंधनकारक आहे. मात्र लालपुलिया परिसरातील ट्रक मालक, चालकाकडून नियमाचे सर्रास उल्लंघन होत आहे. त्यामुळे ट्रकमधील कोळसा वाहतुकीदरम्यान रस्त्यावर पडतो. त्यादरम्यान रस्त्यावरुन जाणाºया वाहन चालकाच्या अंगावर हा कोळसा पडून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे या परिसरात काही ट्रकच्या मागेपुढे ट्रक क्रमांक नाही. नियमाची पायमल्ली करणाऱ्या ट्रकमालक व चालकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.आरोग्याच्या समस्याकोळशाची धूळ उडत असल्याने ती श्वसनाद्धारे आतमध्ये जाते. त्यामुळे नागरिकांना दमा, आतड्याचे विकार, श्वसनाचे विकार अशा अनेक आजार जळत आहेत.
त्यामुळे नागरिकांना विनाकारण आर्थिक भुर्दंड बसत आहे. यासोबतच कोळसा वाहतूक होत असलेल्या ट्रकच्या मागे असणाºया दुचाकीवाहनाच धुळीमुळे अपघातही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने विना ताडपत्रीद्वारे जाणाºया ट्रकवर कारवाई करावी.