अजय कंडेवार,वणी:- विद्यार्थ्यांचा कला गुणांना वाव देण्यासाठी मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी सीबीएसई शाळा परिसर, वडगाव रोड, वणी येथे भव्य स्वरूपातील व्यासपीठ तयार करून मनाला मोहून टाकणारा वार्षिक महोत्सव “द रिदम ….वे टु एक्स्प्रेस ” दिनाक १७ फेब्रुवारी शुक्रवार रोजी उत्साहपूर्वक साजरा करण्यात आला.
या एकदिवसीय महोत्सव मध्ये सुमारे 660 विदयार्थी कलाकारांनी सहभागी होऊन या कलाविष्काराने पालक व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.तसेच अनेक रूढी-परंपरा, अनेक नृत्यकला, भारतीय संस्कृती, महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन देखील विद्यार्थ्यांनी घडवले. अनेक नृत्यात चिमुकल्यांनी ‘आरोग्यदायी आहाराचे महत्त्व’ हा संदेश त्यांच्या कामगिरीद्वारे दिला तसेच प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी ‘ बेटी बचाव…..देश बचाओ ‘ यावर भर दिला. तसेच वेगवेगळे संदेशही देण्याचा प्रयत्न त्यांचा कला मधुन दिसून आला.तर कार्यक्रमाचा शेवट शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पी.एस.आंबटकर, (अध्यक्ष, एमएसपीएम ग्रुप) हे होते .विशेष अतिथी म्हणून प्रिती आंबटकर,(सचिव, एमएसपीएम ग्रुप),पीयूष आंबटकर (उपाध्यक्ष एमएसपीएम ग्रुप),प्रांजली रघटाटे (व्यवस्थापन,एमएसपीएम ग्रुप),अंकिता आंबटकर, (संचालक,एमएसपीएम ग्रुप),पायल आंबटकर,(संचालक, सोमय्या ए.एम. कॉलेज),श्रीमती शोभना मॅडम विशेष अतिथी म्हणून फैयाज अहमद,(प्राचार्य,PMC Chd.), जमीर शेख (प्राचार्य, सोमय्या पॉली. सीएचडी.),राजेश बिसेन(रजिस्ट्रार, एमएसपीएम सीएचडी.)मनीष हिवरे (समन्वयक,ITI),राजदा सिद्दीकी (व्यवस्थापक,भद्रावती), संजय दामले (आयटीआई, मुख्यध्यापक)कन्हैया तिवारी, (एचओडी,सोमय्या करिअर वणी) हे सर्व उपस्थित होते.या कार्यक्रमाचात यशस्वितेकरीता शाळेतील मुख्यद्यापिका शोभना तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग यांनी परिश्रम घेतले.
विविध राज्यांतील नृत्यप्रकारांचा अविष्कार :-
‘नृत्य तरंग’ मध्ये विद्यार्थ्यांनी विविध राज्यांतील नृत्यांचे सादरीकरण केले. मुलांना अनेक राज्यांच्या विविध कलांची माहिती या विषयांतर्गत सांगण्यात आली. त्यामध्ये महाराष्ट्र, गोवा, राजस्थान, गुजरात, अरुणाचल प्रदेश, आसाम, ओडिसा, मिझोरम, केरळ, पंजाब आणि इतरही राज्यांचा समावेश होता. भारतीय संस्कृती, परंपरा, बोलीभाषा, सण आणि त्यांचा पोशाख याचबरोबर विविध राज्यांची अधिक माहितीही विद्यार्थ्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला.
नृत्यातून जपला आदिवासींचा धिकारी सांस्कृतिक वारसा:-
वनबंधू, नृत्यतरंग, कृष्णकथा अशा तीन विषयांवर न्ववादी आधारलेल्या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन माच्या केले. वनबंधू या विषयांतर्गत मुलांना आदिवासी भागांतील चपाटे जीवनमान, संस्कृती आणि परंपरेचे संरक्षण तसेच आदिवासींचा सांस्कृतिक वारसा, संवर्धन आणि प्रोत्साहन यांचे महत्त्व जाणून घेत, विद्यार्थ्यांनी विविध आदिवासी नृत्य सादर केले.