•आगार प्रमुखांना निवेदनाने घातले साकडे…
अजय कंडेवार,वणी : मार्डी ते मारेगाव ही बस फेरी बंद असल्यामुळे विद्यार्थी व नागरिकांचे हाल होत आहेत. आता शाळा, महाविद्यालयांसह सर्व शिक्षण संस्था सुरु होऊन 5 महिन्याचा कालावधीही झाला आहे परंतु, अद्यापही बसेस बंद असल्यामुळे विद्यार्थी जीव मुठीत धरून खासगी वाहनाने प्रवास करीत आहे. परंतू याचा विद्यार्थ्यासह नागरीकांनाही त्रास होत आहे. म्हणून विद्यार्थ्याची ही हेळसांड थांबवण्यासाठी बस सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी वाहतूक सेना राज्य उपाध्यक्ष इरशाद खान यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना मारेगाव तालुका अध्यक्ष रुपेश ढोके व मनसे सैनिकांचा निवेदनाद्वारे परिवहन मंडळाच्या आगार प्रमुखांकडे केली आहे.
शाळा-महाविद्यालयांच्या वेळेवर अनेक मार्गावर बससेवा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना खासगी वाहनाने जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो ही बाब मनसे वारंवार निदर्शनास आणून देत असते. तर वणी तालुक्यातील विवीध मार्गावर विद्यार्थांच्या गैरसोयी टाळण्यासाठी मनसे ने आक्रमक भूमिका घेत अनेक बस फेऱ्या सुरू करुनही दिल्या आहे.मार्डी ते मारेगाव ही बस फेरी चालू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. मनसेच्या या मागणीची परिवहन विभागाकडून तात्काळ प्रतिसाद देत लवकरात लवकर ही बस सेवा सुरू करण्यात येईल अशी माहिती मारेगाव आगार व्यवस्थापक यांनी दिली.
यावेळी आजीद शेख ,शम्स सिद्धीकी, सय्यद युनुस,अयाज खान,उदय खिरटकर, अनंता जुमडे, गणेश क्षिरसागर,रोहित हस्ते, शुभम दाते यांच्या सह सर्व पदाधिकारी ,महाराष्ट्र सैनिक व शाळकरी विदयार्थी उपस्थित होते.