•शेतकरी बांधवांनी सोन्याचा पाऊस असा उल्लेख.
अजय कंडेवार,वणी:- तालुक्यातील वणी, कायर,राजूर परिसरात सोमवारी दुपारी 2 वाजतापासून जवळपास 1 तास विजेचा कडक्यासह पावसाने जोरदार बॅटिंग केली. अचानक झालेल्या या समाधान कारक पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. परीणामी शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळत असुन या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
18 ऑगस्ट पासून पावसाने अचानक दांडी मारली. त्यामुळे कपाशी तसेच विशेषतः सोयाबीन पिकाला पावसाची नितांत गरज होती. मात्र निसर्गाने शेतकऱ्यांची चिंता सध्यातरी मिटवून टाकली असुन या पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात पाऊस महत्वाची भूमिका बजावतात कारण पिकांची वाढ पावसावरच अवलंबून असते.
यंदा सुरवातीला परीसरात पुरपरीस्थीती निर्माण झाली होती. तर पिकांची परिस्थिती देखील त्याकाळात नाजूक होती.त्यानंतर पावसाने थोडी उसंत घेतली व 18 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा पावसाने जोरदार एंट्री केली होती. त्यावेळी सलग पडलेल्या पावसाने पुन्हा एकदा दडी मारली. मात्र आज 4 सप्टेंबर रोजी दुपारी अचानक पावसाचे आगमन झाले. विजांच्या कडकडाटासह झालेला हा पाऊस योग्य वेळी पडला असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत होत्या.सर्वच पिकांची परिस्थिती उत्तम असुन झालेल्या पावसाचा शेतकरी बांधवांनी सोन्याचा पाऊस असा हृदयातून उल्लेख केला.