• “या” जाबाज पोलिस कर्मचाऱ्याला वणीकरांचा सँल्यूट….
•साई मंदिर चौकातील घटना.
अजय कंडेवार,वणी:- शहरातील चायनीज दुकानाला (मोमोस शॉप)ला अचानक आग लागल्याची घटना दि.26 सप्टेंबर रोजी मंगळवारी सायंकाळी 6 वाजताचा सुमारास साई मंदिर चौक येथे घडली. या परिसरात शेकडोचा उपस्थितीने लोकं होते. मात्र, वाहतूक पोलिस अंमलदार अनुराधा वासाडे( ब.नं. 477) हिने मोठ्या हिमतीने त्या दुकानाचा दिशेने धाव घेत वेळीच सावधगिरी बाळगल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.Disaster was averted due to the alertness of Traffic Officer “Anuradha Wasade”.
साई मंदिर चौकात वाहतूक पोलीस अंमलदार अनुराधा वासाडे हे कर्तव्यावर असताना एका चायनीज दुकानाला सायं 6 वाजता अचानक आग लागली व मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याचे लक्षात येताच तेथे मोठी गर्दी जमली. काही कळायच्या आत आणखी धूर वाढू लागल्याने त्या दुकानाचा आजुबाजूला आरडाओरडा सुरू केला.
या चायनिजचा दुकानाचा आजूबाजूला 2 बँक, साई मंदिर, हॉटेल,जैताई मंदिर व इतर छोटे मोठे भरपूर दुकाने व मोठी बाजारपेठ असल्याने सदर आग वाढली असती तर आजूबाजूचे परिसरात मोठे नुकसान झाले अश्या परिस्थितीत यावेळी कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिस “अनुराधा “हिने मोठे धैर्य दाखवित वेळीच समयसूचकता व प्रसंगावधान राखून साई मंदीर चौकातीलच स्टेट बँकेतील उपलब्ध अग्निशामक यंत्र आणून स्वतः त्या आगीवर वेळीच नियंत्रण मिळविले .या घटनेत चायनीज दुकानदाराचा इजा झाली असून स्टॉलची राख रांगोळीच झाली. ही आग जरी किरकोळ स्वरूपातील होती. परंतु आगीचा भडका उडण्यापूर्वीच “अनुराधा वासाडे “(बं. नं.477) आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने खूप मोठे नुकसान टळले. अश्या या जाबाज पोलिस कर्मचाऱ्याला वणीकरांचा सँल्यूट…. याबाबत शहरात कौतुक केल्या जात आहे.