Sunday, May 3, 2026
HomeBreaking Newsवाळू तस्करीत वणी तहसील प्रथम क्रमांक आला का......?

वाळू तस्करीत वणी तहसील प्रथम क्रमांक आला का……?

•"विवेकबुद्धीने" तालुक्यांत बेधडक रेती तस्कर वाढले . •महुसल विभागाचा "गाड्या पकडो "आलेख घसरला. •"चार दिन की चांदणी.. बाकी अंधेरी रात "अशी सद्यस्थिती.

Ajay Kandewar,Wani :- राज्यभरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांचे मूल्यमापन करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने १०० दिवसांचा” कृती आराखडा” हा उपक्रम राबविण्यात आला. अमरावती विभागातील अंतिम मूल्यमापनानंतर वणी तहसील कार्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला परंतु पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, स्वच्छतामध्ये पोल खोल झाली . आणि जनतेतून असा सवाल व्यक्त होत आहे की, साहेब वाळू तस्करीत वणी तहसील प्रथम क्रमांक….? आला का? कारण तालुक्यातील रेती तस्करी प्रकाशझोतात आल्यानंतर महसूल यंत्रणा ‘अॅक्शन मोड’वर आली होती परत “जैसे थे स्थिती” ठेवत कारवाई जेमतेम बंद झाली आहे . यांचा अर्थ असा की रेती तस्करी बंद झाली का साहेब असा प्रश्न जनतेतून ऐकू येत आहे.काही दिवसांपूर्वी त्यांनी अवैध रेती उत्खनन करणाèयांवर कारवाई करून मोठा गाजावाजा केला. मात्र तालुक्यात आता दिवस-रात्र खुलेआम होत असलेल्या रेती तस्करीला महसूल विभागाने खुली सूट दिल्याचे दिसत असल्याच चित्रावरून “चार दिन की चांदणी.. बाकी अंधेरी रात “अशी सद्यस्थिती महसूल विभागाची झाली आहे असे दिसूनही येते.

तालुक्यात सध्या मोठमोठे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाला नियमितपणे रेतीचा पुरवठा होत आहे पण कुठून? कित्येक गरिबांचे घरकुल रेतीअभावी रखडले आहेत. धनदांडग्यांना हवी तेव्हा रेती मिळत असून आणि गरिबांना मात्र अद्यापही वंचित राहावे लागत आहे.गरिबांच्या घरकुलासाठी फुकटची तर दूरच, विकतचीसुद्धा रेती मिळेनाशी झाली आहे. वर्धा नदीपात्रातून अद्यापही रेती तस्करी थांबली नाहीच दररोज रात्री ट्रक व टिप्परने अवैध रेती वाहतूक होते. त्यावेळी महसूल झोपलेला असतो कारण आर्थिक नजराणा मिळाला की, तुमचे तुम्ही चालू द्या असा प्रकार सध्या तालुक्यात खुलेआम सुरू आहे. अशीही खमंग चर्चा रंगू लागली आहे.

•तहसील प्रशासन झोपेचे सोंग…..

अहोरात्र तस्करांचा धुमाकूळ सुरूच आहे. मात्र, तहसील प्रशासन झोपेचे सोंग घेऊन असल्याने रेती तस्कर भरदिवसा ट्रॅक्टर, ट्रक व टिप्परने तस्करी करत आहेत.  घाटातून अहोरात्र रेती उपसा नदीपात्रातून होत आहे. रेतीघाटांचे लिलाव झालेले नसतानाही वर्धा नदीपात्र पोखरून मोठ्या प्रमाणात रेतीचोरी होत आहे. त्यामुळे शासकीय कर्मचारी या “रेती चोरांच्या वेसणीला” बांधलेले आहेत असा निष्कर्ष नागरिक काढत आहेत. आणि थातूरमातूर कारवाई करून सारवासारव सूरू आहे. मालक तर कधीच कारवाई झाली नाही हे तर विचित्रच या प्रशासनाच भोंगळ सूरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page