Tuesday, February 17, 2026
HomeBreaking Newsवाढत्या रेती तस्करीबाबत तहसीलदाराची "डोळे बंदची" भूमिका....?

वाढत्या रेती तस्करीबाबत तहसीलदाराची “डोळे बंदची” भूमिका….?

•"पुष्पा"च्या संख्येत दिवसंदिवस वाढ आहे हो साहेब. •काहींची चक्क "त्या खादाडासोबत" उठबस.

Ajay Kandewar,:- तालुक्यातील वाढत्या रेती तस्करी बाबत तहसिलदारानी ध्रुतराष्ट्राची भुमिका घेतली आहे का?. कारण रेती तस्करांचा तालुक्यात उतमाच सुरु असतांना त्यांच्यावर कार्यवाह्या मात्र होतांना दिसुन येत नाही. अनेक रेती तस्कर राजकीय पक्षाची संबधित असल्याने व त्यातील काहींची चक्क “त्या एका खादाडासोबत” उठबस असल्याने बाकिंचे “काही खादाड” हे रेती तस्करीबाबत गप्प बसण्यातच धन्यता मानत आहे अशी दबक्या आवाजात चर्चा ऐकू येत आहे.

तालुक्यात रेतीच्या तस्करीमध्ये अनेक “पुष्पा” तयार झाले आहे. “त्या खादाड “ चें मिळत असलेल्या पाठबळामुळे तालुक्यात “पुष्पा”च्या संख्येत दिवसंदिवस वाढ होत चालली आहे. अनेक पांढरपेशी सुध्दा रेती तस्करीमध्ये गुंतले असल्याने सामान्य कर्मचारी त्यांच्यावर कार्यवाही करण्यास धजावत नसल्याचे दिसुन येते. शिवाय याआधी काही तलाठ्यांना याच” पुष्पांनी” रेतीचे ट्रक पकडले असतांना रस्त्यावर अडवुन धमकावुन त्यांच्या तावडीतुन पकडलेले ट्रक घेवुन पोबारा केल्याच्याही झरि तालुक्यांतील अनेक घटना घडलेल्या आहे. या प्रकरणात ” खादाड “ मूळे रेती तस्करीबाबत चुप्पी साधुन आहे.

तालुक्यातील नदी, नाल्यावरील रेती घाट जणु तस्करांनी विकत घेतल्या सारखेच तेथुन दिवसरात्र रेतीचा उपसा करण्यात येत असल्यावरुन दिसुन येत आहे.  “एका खादाडाने” तर थेट “पै…. फेक तमाशा देखची””” भुमिका घेतल्याने तस्करांमध्ये रेती तस्करीची आपसी स्पर्धा सुध्दा वाढत चालली आहे. या आपसी स्पर्धेतुन तस्करांमध्ये दैनदिन वादही होत आहे. तस्करी व तस्करांच्या आपसी स्पर्धेतुन शहर व तालुक्यात एखाद दिवशी मोठी अनुचित घटना घडण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. तहसीलदाराने “तो खादाड कोण” हे देखील शोधून काढणे गरजेचे आहे. नाहीतर अस म्हणायला वावग ठरणार नाही की,वाढत्या रेती तस्करीबाबत तहसीलदाराची धुत्रराष्ट्राची भूमिका आहे का अशी सध्या तालुक्यांत चर्चा सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments