Ajay Kandewar, Wani :वणी शहराच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. एका स्वीकृत नगरसेविकेच्या नियुक्तीवरून भारतीय जनता पक्षात तीव्र अंतर्गत नाराजी निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पक्षांतर्गत सूत्रांकडून समोर येणाऱ्या माहितीनुसार, स्विकृत तसा “नकोच नको…. ही नाराजी उघडपणे समोर येत नसली, तरी पक्षाच्या अंतर्गत बैठका, समजुदारी आणि चर्चांमधून अस्वस्थतेचे सूर स्पष्टपणे ऐकू येत आहेत.
दुसरीकडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातही असाच असंतोष वाढताना दिसत आहे. माजी नगरसेवक, माजी शहरप्रमुख तसेच सभागृहात ठाम, आक्रमक आणि मुद्देसूद भूमिका मांडण्याचा अनुभव असलेले निष्ठावंत नेतृत्व बाजूला ठेवून नवख्या व्यक्तींना संधी देण्यात आल्याची चर्चा आहे. यामुळे पक्षाची सभागृहातील भूमिका प्रभावी न राहता केवळ औपचारिक ठरत असल्याचे मत व्यक्त होत आहेत.
विशेष म्हणजे, बलाढ्य भाजपाला सामोरे जाण्यासाठी सक्षम आणि अनुभवी विरोधी नेतृत्व जबरदस्त आवश्यक असताना, अशा नेतृत्वाला डावलण्यात आल्याने शहराच्या राजकारणात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. निर्णयप्रक्रियेत पारदर्शकता आहे का, कार्यकर्त्यांच्या निष्ठेला योग्य न्याय मिळतो आहे का ?आणि पक्षांतर्गत लोकशाही प्रत्यक्षात कितपत प्रभावी आहे, यावर चर्चा सुरू झाली आहे.या संपूर्ण घडामोडींमुळे दोन्ही पक्षांच्या अंतर्गत धोरणांबाबत आणि नेतृत्वाच्या निर्णयक्षमतेबाबत जनतेत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्याची परिस्थिती पाहता, ही अस्वस्थता जर वेळीच नियंत्रणात आली नाही, तर आगामी काळात वणीच्या राजकारणावर याचे राजकीय निर्णयांवर प्रश्नचिन्ह; वणीत भाजप-शिवसेना (उबाठा)मध्ये खदखद परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

