•वाहतुकीच्या नियमांबाबत अत्यंत मोलाचे मार्गदर्शन.
अजय कंडेवार,वणी:- रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त नागरिकांमध्ये वाहन नियमांची जनजागृती व्हावी, मोटार वाहन अपघाताला परिणामकारकरित्या आळा बसावा , नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचा प्रचार व प्रसार होण्याकरीता राज्य रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमा”अंतर्गत व वाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित्त वाहतूक नियंत्रण,उपशाखा वणी जिल्हा यवतमाळच्या वतीने वाहतूक नियमां बाबत मार्गदर्शन करण्यात आले.’Road Safety Mission’ at Wani
14 जाने ते 14 फेब्रुवारी या कालावधीत “राज्य रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमा”अंतर्गत व वाहतूक सुरक्षा सप्ताह साजरा करण्याचा सूचना देण्यात आले.त्या आदेशानुसार वणी वाहतूक विभागाचा वतीने तीन दिवसीय कार्यक्रम पार पडला.पहिल्या दिवशी 12 फेब्रुवारी रोजी शहरातील लायन्स शाळेत वाहतूक नियंत्रण उपशाखा प्रमुख API सीता वाघमारे यांनी ,” विद्यार्थ्यांशी वाहतूक सुरक्षा सप्ताह निमित्त संवाद साधून वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे सुरक्षित मानवी जीवना साठी आवश्यक असून केवळ दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी आपण हेल्मेट व सीटबेल्ट चा वापर करतो.हे योग्य नसून आपण सर्वांनी वाहतूक नियमांची माहिती व तीच्या पालनाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे असे प्रतिपादन केले” तसेच 13 फेब्रु.रोजी दुसऱ्या दिवशी ऑटो चालक तसेच इतर वाहन चालक-मालक यांना मार्गदर्शन करीत तसेच वाहतुकीचे नियमाबाबतचे पत्रक वितरित केले व 14 फेब्रुवारी रोजी तिसऱ्या दिवसीय कार्यक्रम शहरातीलच मुख्य चौकात पोद्दार लर्न स्कुल मंदर या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्यामध्ये वेगाने वाहन चालविणे, मद्य प्राशन करून वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, चुकीच्या बाजूने वाहन चालविणे, दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान न केल्याने काय दुष्परिणाम होतात या बाबत संदेश दिला.
डॉ.पवन बनसोड(पोलीस जिल्हा अधीक्षक),पियुष जगताप (अप्पर पोलिस अधीक्षक), गणेश किंद्रे (उपविभागीय पोलीस अधिकारी )यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि अजित राठोड जि.वा.शा यवतमाळ यांच्या सुचेनेने वणी वाहतूक शाखा प्रमुख API सीता वाघमारे यांचे नेतृत्वात पथनाट्य, पत्रकवाटप व विद्यार्थांना मार्गदर्शनाद्वारे विविध कार्यक्रम घेण्यात आले.यावेळी समस्त कार्यक्रमात वाहतूक शाखेतील कर्मचारी गोपाल हेपट ,प्रदीप भानारकर ,रामदास धोंगडे , किशोर डफळे व इतर वाहतूक कर्मचारी हे उपस्थित होते.