अजय कंडेवार, वणी :वणीच्या राजकीय रंगभूमीवर सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे तो म्हणजे भाजपातून विजय चोरडिया आणि उमेश पोद्दार यांचा बाहेर पडण्याचा निर्णय.या दोघांच्या निर्गमनाने आता वणीमध्ये चर्चा रंगली आहे वणी भाजपाने खरंच “हिरा” गमावला की फक्त एक “काच तुटली”? विजय चोरडिया हे गेल्या काही वर्षांत वणी भाजपातील उच्चावरील संपर्काचे आणि संघटनातील ऊर्जेचे केंद्र मानले जात होते.तथापि, काही कार्यकर्त्यांच्या मते, चोरडिया यांचा “ओव्हर कॉम्प्रेस” झाला होता. म्हणजे पक्षात त्यांची उंची दाखवली गेली, पण ठोस निर्णयक्षमता व प्रभाव मर्यादित राहिला.माजी आमदार संजय बोदकुरवार यांच्याशी न जमलेले सूत, संवादात आलेला तणाव आणि स्थानिक गटबाजी यामुळे अखेर चोरडिया यांनी दुसऱ्या दिशेचा मार्ग धरला.आता प्रश्न असा आहे. शिंदे गटात गेल्यावर त्यांचे “विश्वास ” सूत विजय चोरडिया आणि त्यांच्या नव्या टीमसोबत जुळणार का? हे बघणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
• उमेश पोद्दार शांत पण “किंग मेकर” ठरणार का?
सामाजिक क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे उमेश पोद्दार आता उबाठा झेंड्याखाली कार्यरत झाले असून, त्यांच्या प्रवेशाने पक्षाला ही नवसंजीवनी मिळाल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे.उमेश पोद्दार हे स्वभावतः शांत, परंतु संघटन कौशल्यात प्रवीण आणि योजनाबद्ध कार्यपद्धतीसाठी ओळखले जातात. वणीत त्यांचा आवाज हा जनतेच्या मनात विश्वासाचे प्रतीक मानला जातो.त्यांच्या नेतृत्वाखाली उबाठा सेनेत तरुण उबाठा सेनेच्या भूमिकेकडे उत्सुकतेने पाहू लागले आहेत.आगामी नगरपरिषद निवडणुकीत उमेश पोद्दार यांचा गट “किंगमेकर” ठरू शकतो, कारण त्यांच्या संघटनशक्तीचा आणि जनसंपर्काचा प्रभाव थेट मतदारांपर्यंत पोहोचतो.पोद्दार हे फक्त कार्यकर्ता नाहीत, तर ते एक उबाठा ब्रँड आहेत शांततेतून परिणाम घडवणारे.असा सूर आता पोद्दार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उमटताना दिसतो.उमेश पोद्दार हे सामाजिक क्षेत्रात ओळखले जाणारे नाव.त्यांची कार्यशैली ‘शांत पण अचूक’ . येत्या नगरपरिषद निवडणूकित धोका निर्माण होणार यात “नो डाऊट “.
•वणीच्या राजकीय नकाशात तीन गट
1. भाजप (बोदकुरवार गट) – मजबूत ग्रामीण पकड, परंतु शहरात थोडा असंतोष तरीही शहरात पकड मात्र मजबूत.2. शिंदे सेना गट (विजय चोरडिया ) – व्यापारी, व्यावसायिक मतदारांवर लक्ष.3. उबाठा सेना / काँग्रेसचे कार्यकर्ते – पारंपरिक मतदार टिकवण्याच्या धडपडीत.

