अजय कंडेवार,वणी:- तालुक्यातील रासा जाणा-या मारेगांव कोरंबी गावालगत शेत शिवारातील नाल्यालगत गावातील कोंबड पक्षाच्या झुंझिवर जुगार खेळला जात असतानाच वणी पोलिसांनी धाड टाकून 63 हजाराचा वर मुद्देमाल हस्तगत करून 6 आरोपीना वणी पोलिसांनी ताब्यात घेत त्यावर रितसर गून्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की,वणी ते रासा जाणा-या मारेगांव कोरंबी गावालगत शेत शिवारातील नाल्यालगत भागात काही इसम सार्वजनिक ठिकाणी कोंबडा या पक्षाची झुंजीवर पैश्याची बाजी लावुन हार-जितचा कोंबड जुगाराचा खेळ खेळवित आहे. या माहिती वरून वणी ठाणेदार पो.नि. प्रदिप शिरसकर यांचे मार्गदर्शनात सपोनि आशिष झिमटे व यांचा चमुनी धाड मारली असता त्यात आरोपी
१) अक्षय पुंडलीक डोळसे वय २७ वर्ष २) सचिन सुरेश डाहूले वय २८ वर्ष ३) संजय दशरथ खोके वय ४५ वर्ष ४) लक्ष्मण उत्तम खोके वय ४६ वर्ष ५) धनंजय अशोक वैदय वय २८ वर्ष सर्व रा.मारेगांव कोरंबी (६) मोहन मारोती कूचणकार वय ४० वर्ष रा. विरकूड, ता वणी हे सर्व आरोपी कोंबडा पक्षाचे झुंजी वर पैशाची बाजी लावुन हार-जीतचा जुगार खेळत असताना मिळुन आले. घटनास्थळावरून १ मरण पावलेला व २ मरणासन्न अवस्थेत असलेला कोंबडापक्षी एकूण ३ नग किंमत ३००/- रूपये व २ लोखंडी धारदार काती किंमत १००/- रूपये व नमुद इसमान कडुन एकुण नगदी २०९० /- रूपये तसेच नमूद ईसमांकडून एकूण ४ वेगवेगळया कंपनीचा मोबाईल एकूण किंमत ३८,०००/- रूपये व एक जूनी स्प्लेंडर मोटार सायकल कमांक एम.एच / २९ / वाय ५०३२ ज्याचे किंमत अंदाजे २३,००० /- रूपये असा एकुण ६३,४९० /- रूपयाचा मुद्देमाल मिळुन आला.
सदरची कार्यवाही डॉ. पवन बनसोड पोलीस अधिक्षक यवतमाळ, पियुष जगताप अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ, संजय पुज्जलवार उप.वि.पो.अ. वणी यांचे मार्गर्शनात ठाणेदार पो.नि प्रदिप शिरसकर यांचे आदेशावरून पोउपनि झिमटे पोउपनि प्रविण हिरे, डोमाजी भादीकर, वसिम, सागर, महेश , मनोज यांनी कारवाई केली. पुढील तपास पोउपनि प्रवीण हिरे करीत आहे.