Wednesday, July 15, 2026
HomeBreaking Newsवणी परिसरातील मुजोर O.B कंपन्यांना 10 दिवसांचा अल्टिमेटम्......

वणी परिसरातील मुजोर O.B कंपन्यांना 10 दिवसांचा अल्टिमेटम्……

Ajay Kandewar,Wani:- वेकोलीमधील माती उत्खनन(ओव्हर बर्डन) करणाऱ्या परिसरातील कंपनीमध्ये स्थानिक बेरोजगारांना ८०% रोजगार उपलब्ध करून देण्याकरीता बाध्य करावे या करीता यवतमाळ जिल्ह्याचे शिवसेना (UBT) जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांनी वणी SDO यांना निवेदनाद्वारे मागणी केली. जर येत्या 10 में या तारखेपर्यंत कंपन्यांनी जर भूमीपुत्रांना रोजगार देण्यास मज्जाव केला तर परिसरातील समस्त कंपन्याचे 12 में रोजी पासून “कामबंद आंदोलन” करण्याचा इशारा या निवेदनातून देण्यात आला.

वेकोली प्रशासनाने आणि माती उत्खनन (O.B ) करणाऱ्या कंपन्यांनी तात्काळ दखल घेतली नाही तर कामगार कायद्याचे पालन करून येत्या १० मे पर्यंत स्थानिक बेरोजगारांना ८०% रोजगार उपलब्ध करून द्यावा अन्यथा वणी विधानसभा आ.संजय देरकर यांचे उपस्थितीत व शिवसेना (UBT ) जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांच्या नेतृत्वात १२ में रोजी तीव्र स्वरूपाचे “कामबंद आंदोलन” छेडण्यात येईल असा सज्जड दम निवेदनातून देण्यात आला आहे.

निवेदन देताना शरद ठाकरे,प्रकाश कराड ,विनोद धुमने ,सुधीर थेरे ,विलास बोबडे, आनंद धोटेकर, राजू तुरनकर व आदि शिवसैनिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page