•डॉ.लोढा यांनी केला 5 लाखांचा घणघणाती आरोप
सुरेंद्र इखारे, वणी – गेल्या महिन्याभरापासून शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने तात्काळ ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांची बदली करण्यात यावी या मागणीचे निवेदन समाजसेवक नारायण गोडे व पत्रकार संघटना यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले.
वणी शहरात सातत्याने घरफोडी, लूटमार, फसवणूक, दरोडा, वाहन चोऱ्या यासारख्या घटना नित्याच्या झाल्याने त्यांची हिंमत वाढून वणी येथील एका पत्रकाराच्या घरात घरफोडीच्या दरम्यान अट्टल गुन्हेगारांने पत्रकारावर हल्ला चढवून पळ काढला आहे व अजूनही गुन्हेगार पोलिसांच्या हाती न लागल्याने पोलीसांचा व ठाणेदाराच्या निस्क्रीयतेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा बट्ट्याबोळ झाला आहे . तसेच काल तत्काळ एस पी यांनी पत्रकार बांधवांनी दिलेल्या निवेदाद्वारे व आमदार संजीव रेड्डी यांचा दालनात पत्रकार मोर्चा केल्याने काल वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना खडेबोल सुनावले व यवतमाळ एस . पी यांना वणी येथे पाठविण्यात आले.काल एस पी यांचा झालेला बैठकीत डॉ.लोढा यांनी केला 5 लाखांचा घणघणाती आरोप केला आहे .त्यातही एस पि .नी स्पष्ट बाजू सावरल्याचा आरोपही होत आहे. अनेक पत्रकारांनी वणीचे हाल सांगीतले.
त्यामुळे ठाणेदार महल्ले यांची तात्काळ उचलबांगडी करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन संबंधित अधिकारी पोलीस अधीक्षक, महाराष्ट्रचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, एसडीपीओ संजय पूजजलवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार संजीवरेड्डी बोडकुरवर, याना देण्यात आले आहे. या निवेदनात समाजसेवक नारायन गोडे, रवी बेलुरकर, दीपक छाजेड, संदीप बेसरकर, सुनील पाटील, व अन्यही पत्रकारांचा सह्या होत्या.