Tuesday, February 17, 2026
HomeBreakingवणीत PWD अभियंते–कंत्राटदारांची उघड लूट....

वणीत PWD अभियंते–कंत्राटदारांची उघड लूट….

Ajay Kandewar,Wani:- वणी विधानसभा मतदारसंघात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते कामांबाबत एक धक्कादायक वास्तव समोर येताच राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. Defect Liability Period (DLP) लागू असतानाही काही ठेकेदारांनी पूर्ण रक्कम उचलून थेट पोटात गबन केल्याची माहिती समोर येताच आमदार संजय देरकर यांनी हा गंभीर प्रश्न विधिमंडळात उचलला. मात्र या प्रश्नाला विभागाने अक्षरशः केराची टोपली दाखवली, असेच स्पष्ट चित्र सध्या दिसून येत आहे.

DLP म्हणजे रस्त्याच्या कामाची हमी, दुरुस्तीची जबाबदारी आणि जनतेच्या सुरक्षिततेचा नियम. पण वणीतील काही रस्त्यांवर DLP चा नियम पायदळी तुडवत, काम अपूर्ण, निकृष्ट आणि धोकादायक अवस्थेत ठेवूनही ठेकेदारांनी संपूर्ण देयके उचलल्याचे आरोप आता उघडपणे होत आहेत. हा प्रकार निष्काळजीपणाचा नसून जाणीवपूर्वक केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराचा संशय निर्माण करणारा आहे.आमदार देरकरांनी हा मुद्दा विधिमंडळात मांडल्यानंतर तरी संबंधित विभाग जागा होईल, अशी अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात मात्र ना चौकशी, ना खुलासा, ना ठेकेदारांची नावे—फक्त मौन. यामुळे एकच प्रश्न उपस्थित होतो, दोषी ठेकेदारांना कोण वाचवत आहे? आणि DLP नियम झुगारून पैसे उचलणाऱ्यांवर कारवाई का होत नाही?रस्त्यांची दयनीय अवस्था जनतेच्या डोळ्यांसमोर आहे, पण फाईलवर मात्र सगळे काही सुरळीत दाखवले गेले आहे. ही दरीच आता संतापाला कारणीभूत ठरत आहे. नागरिकांमध्ये चर्चा नाही, तर थेट आरोप होत आहेत की, ठेकेदार आणि विभागातील काही अधिकारी मिळून जनतेच्या पैशावर डल्ला मारत आहेत.

आता वणीतील जनतेची मागणी स्पष्ट आहेDLP न पाळता पैसे उचललेल्या ठेकेदारांची नावे जाहीर झालीच पाहिजेत.त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे.आणि या प्रकरणात ज्यांनी डोळेझाक केली, त्या अधिकाऱ्यांनाही जबाबदारी निश्चित झालीच पाहिजे.विधिमंडळात प्रश्न उचलूनही जर विभाग गप्प बसत असेल, तर हा प्रश्न आता रस्त्यावर उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही.कारण वणीची जनता आता एकच म्हणतेय— रस्त्यांवर खड्डे सहन होतील, पण जनतेच्या पैशाचा गबन नाही! डी एल पी च्या नावावर काही ठेकेदारांनी पैशाची उचल केलेली आहे अशा ठिकाणाचे नाव उघड झालेच पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई चौकशी झालीच पाहिजे अशा पद्धतीचा नागरिकांचा तीव्र सवाल उपस्थित झालेला आहे. या प्रकरणात संबंधित E.E काम असताना देखील याकडे पूर्णत्व कांडोळा करण्याचे कार्य या संबंधित अभियंताने केल्याचे स्पष्ट निदर्शनात येत आहे म्हणून यावरून स्पष्ट म्हणता येईल की येईल कोमात आहे की जोमात आहे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments