Saturday, August 1, 2026
HomeBreaking Newsवणीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात.....

वणीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात…..

Ajay Kandewar,Wani: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवा विचार मंच, वणी यांच्या वतीने शनिवारी (दि. १ ऑगस्ट) कल्याण मंडप, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भव्य जयंती अभिवादन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि परिवर्तनवादी कार्याला अभिवादन करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या मनोगतातून अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या अनेक मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजयभाऊ देरकर होते, तर उद्घाटन माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते झाले. प्रमुख उपस्थितीमध्ये पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर, काँग्रेस नेते संजय खाडे, नगराध्यक्ष विद्या आत्राम, अनिकेत बदखल, करुणा कांबळे, ऋतिक मामीडवार व नथ्युजी नगराळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची प्रस्तावना हिरेश पोटफोडे यांनी केली, सूत्रसंचालन प्रकाश तालावार सर यांनी केले, तर नागेश मोहुर्ले यांनी आभार मानले.हिरेश पोटफोडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शैलेश खडसे, महादेव जाधव, नरेश ससाणे, अमोल बावणे, सचिन ठोंबरे, सागर डोंगरे, रतन खडसे, अशोक पोटफोडे, सुरज चाटे, राकेश शंकावार, निलेश परगंटीवार यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त पहिल्यांदाच भव्य रॅली 

कार्यक्रमानंतर समाजबांधवांनी ढोल-ताशांच्या गजरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिकृती रथाची भव्य मिरवणूक संपूर्ण वणी शहरातून काढली. मिरवणुकीत मोठ्या संख्येने युवक, महिला व नागरिक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, वणी शहरात अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर भव्य प्रतिकृती रथ मिरवणूक काढण्यात आल्याने हा सोहळा ऐतिहासिक ठरला. 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page