अजय कंडेवार,Wani:- शहरासह वणी तालुक्यात सुरू असलेल्या नशेच्या बाजारावर ‘विदर्भ न्युज’ने प्रकाश टाकला. राज्य उत्पादन शुल्क विभागाचा ‘आशीर्वादा’ने शहर परिसरात सुरू असलेला मद्यपींचा खुलेआम हैदोस समोर आणला. तथापि, हा प्रकार एवढा खुलेआम सुरू राहतो कसा? असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहे. त्याचे उत्तर आहे वरकमाईचे अर्थकारण! वाइन शॉप, बिअर शॉपी आणि मद्यपींच्या सोयीसाठी उघडलेले ढाबे, हॉटेल येथून मिळणाऱ्या ‘वरकमाई’वर वणी येथील राज्य उत्पादन शुल्क (एक्साइज) विभाग मजेत आहे. या व्यवसायातील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या विभागाचे अलिखित हप्त्याचे रेट कार्डच तयार आहे.! असे म्हटल्या जाते.
वणी शहरात भर नागरी वसाहतीमध्ये अनेक ठिकाणी बिअर शॉपी थाटण्यात आल्या आहेत. या बिअर शॉपीलाच बारचे स्वरूप शॉपीचालकांनी दिले.नागरिकांकडून सातत्याने तक्रारी आल्यानंतर ‘विदर्भ न्युज ’समोर विविध ठिकाणीचें वास्तव समोर आले.बिअर शॉपी,देशी-विदेशी दारू दुकानांच्या आजूबाजूला मद्यपींच्या पिण्याची सोय करण्यात आली आहे. यामुळेही शहरात खळबळ उडाली. बसस्थानक, खुले परिसरात तर रस्त्यावरच ‘मधुशाला’ भरविण्यात येत होती. खुलेआम हा प्रकार सुरू असतानाही वणी येथील राज्य उत्पादन शुल्क विभाग मात्र अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्ट झाले. यातून कर्तव्य कोमात जाऊन “वरकमाई जोमात” सुरू आहे.आहेत.शासण निर्णयानुसार व निकषानुसार धाब्यावाल्याना,बियरबार वाल्याना,व रेस्टारंट वाल्याना वेळेचे बंधन दिल्यानंतर ही ते आपले नियमावलीची पायमली केल्याचे दिसुन येत आहे. तरीही वणी येथिल “तो “अधिकारी खिसे भरून म्हणतो की, दोन अधिकारी आहोत.. मी एकटाच का .. अशी दबक्या आवाजात चर्चा ही सूरू आहे.या मुजोर व वरकमाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर वरिष्ठांनी कारवाई करुन निलंबन करण्यात यावें अश्या मागणीला जोर धरताना दिसून येत आहे.
•देशी-विदेशी दारू दुकान…...
देशी-विदेशी दारू दुकानात केवळ मद्य परवाना असलेल्या ग्राहकाला दारू विक्री करण्याची परवानगी आहे. मात्र, सर्रास कोणालाही दारू विक्री करण्यात येते. इतर लायसन्सधारकांच्या परवान्यावर ही विक्री खपवली जाते. कारण असे अनेक व्हिडिओज पुण्यनगरीने पुरावे म्हणून ठेवले आहे.दुकानदार जेव्हा याबाबत मासिक विवरण एक्साइजला देतात, त्यावेळी या घोळाकडे दुर्लक्ष करणे, बुटलेगिंगच्या प्रकाराकडे दुर्लक्ष करणे.
•एक्साइजला विभागाला हप्ते मिळण्यासाठी कारणे….?
१उशिरापर्यंत परमिट रूम चालवणे ,२.मालात तफावत, दुसऱ्या बॅचचा माल, ३.जागो जागी दारूच्या विक्रीकडे सर्रास दुर्लक्ष,४.रात्री उशिरापर्यंत शॉपी सुरू ठेवण्याची मुभा,५.बिअर शॉपीमध्ये दारू पिणाऱ्यांकडे लक्ष न देणे.अश्या कारणांनी “या विभागाच्या वणीतील “त्या अधिकाऱ्याला” प्रचंड माया गोळा करता येते हेही सत्यच.आता येणाऱ्या भाग- 2 मध्ये “त्या मुजोर अधिकाऱ्याने” केलेल्या काही कारनामांची पोल-खोल होणार आहे.