Tuesday, February 17, 2026
HomeBreaking Newsवणीत युती-आघाडीत 'एक अनार, सौ बिमार'......!

वणीत युती-आघाडीत ‘एक अनार, सौ बिमार’……!

पक्षात प्रवेश घ्या तिकीट पक्की करा रे....निवडणुकांसाठी "फिल्डिंग" जोरदार रे.. बाबा  •राजकारणातील नवख्यांनाही नगरसेवकपदाची स्वप्ने.

Ajay Kandewar, Wani: विधानसभेच्या निवडणुकांनंतर आता नगर परिषदेसह जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांच्या हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर इच्छुक राजकीय पदाधिकार्‍यांनी पूर्व तयारी सुरु केली आहे. दरम्यान, वणी तालुक्यात तर काही इच्छुकांनी अक्षरशः गुडघ्याला बाशिंग बांधून या निवडणुकांसाठी मोर्चे बांधणे सुरू केली आहे. शहरात नगरपालिका तर ग्रामीण भागात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांसाठी इच्छुक मंडळी सज्ज झाली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत येथे झालेल्या सत्तांतरामुळे वणी मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अधिक चुरशीच्या होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. कारण कारण जो तो आपापल्या पक्षाचा झेंडा घेत “मीच यंदा नगरसेवक, नगराध्यक्ष”,” मीच यंदा जिल्हा परिषद सदस्य”, “मीच यंदा पंचायत समिती सदस्य” म्हणून स्वयंघोषितांच चित्र होताना दिसत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीला आताकाही महिने शिल्लक आहेत. मात्र, नगराव नगरसेवकपदाची अनेकांना स्वप्ने पडू लागलीत. यातच महायुती व महाआघाडीत अनेकांनी आतापासून बाशिंग बांधल्याचे चित्र आहे. त्यामुळे  आगामी निवडणुक जोरदार होण्याची चिन्हे उमटली असून “एक अनार सौ बिमार ” या स्थितीने मोठ्या नेतृत्वापुढे ही मोठे आव्हान उभे राहण्याची दाट शक्यता आहे.

तालुक्यात मोठ मोठ्या “आकांकडे ” चापलूस्की करून काहीं इच्छुकांच्या रांगा लागले असल्याचे चित्र आहे, मात्र आता विधानसभेच्या निवडणुकीत वणी मतदार संघाचे सत्तांतर झाल्याने इच्छुक पदाधिकार्‍यांसह कार्यकर्तेही द्विधा मनः स्थितीत असल्याचे बोलले जात आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आता तर नवीन क्रेझ सुरू झाला आहे.तो म्हणजे पक्षात प्रवेशाचा ओघ प्रत्येक ” जहाँ दम…वहाँ हम ” अशी स्थिती सध्या वणी मतदारसंघात दिसत आहे.यामुळं प्रत्येक गटात काहीसे चिंतेचे वातावरण असल्याचे बोलले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments