Monday, August 31, 2026
HomeUncategorizedवणीत जन्माष्टमीचा ‘डान्स धमाका’.....!

वणीत जन्माष्टमीचा ‘डान्स धमाका’…..!

Ajay ,Wani : शहरात श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवानिमित्त जय श्रीकृष्ण जन्माष्टमी महिला उत्सव समिती, वणीच्या वतीने गुरुवार, दि. ३ सप्टेंबर रोजी मुकुटबन रोडवरील श्री विनायक मंगल कार्यालयात बाल कृष्ण दर्शन फॅन्सी ड्रेस व भव्य नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १२ वाजता फॅन्सी ड्रेस स्पर्धा, तर दुपारी २ वाजता नृत्य स्पर्धेला सुरुवात होणार आहे. फॅन्सी ड्रेसमध्ये ५ वर्षांपर्यंतच्या बालकांना सहभागी होता येणार असून प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ५१००, ३१०० व २१०० रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत.

नृत्य स्पर्धेत ४ ते ८, ९ ते १६ आणि ४ ते १६ वर्षे अशा विविध गटांत सोलो व ग्रुप डान्स सादर करता येणार असून ग्रुप डान्सच्या प्रथम विजेत्यास तब्बल २१ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी नोंदणीची अंतिम तारीख २ सप्टेंबर आहे. वणीतील पालक, बालगोपाळ व नृत्यरसिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्षा ॲड.ख्याती कुणाल चोरडिया व समितीने केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page