•महाराष्ट्रातील प्रथमच भव्यदिव्य चॅम्पियन्स लीगचा उद्घाटनाला अलोट गर्दीची शक्यता.
•ॲड. कुणाल चोरडिया, सचिव उमेश पोद्दार यांची चमू अहोरात्र कामात.
अजय कंडेवार,वणी:- गौतमीचा कार्यक्रम म्हणजे गर्दी, टाळ्या, शिट्ट्या, हुल्लडबाजी तर होणारच आहे पण शेवटी गौतमीचा ठुमके बघणे म्हणजे चाहत्यासाठी नशीबच.वणीतील चाहत्यांना “सबसे कातील…गौतमी पाटील” हिचा डान्स लाईव्ह बघायला मिळणार आहे. ॲड.कुणाल चोरडिया यांच्या विशेष पुढाकाराने महाराष्ट्रात प्रथमच भव्यदिव्य अश्या चॅम्पियन्स लीगचे आयोजित प्रेमराज पारसमल ज्वेलर्स प्रस्तुत भव्य टी -10 क्रिकेट चॅम्पियन्स 29 डिसें. रोजी उद्घाटन प्रसंगी वणी येथील शासकीय मैदानात सायं 7 वाजता गौतमी पाटीलचे बहारदार नृत्य कार्यक्रमाचे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विशेष कार्यक्रमाकरीता पोलिसांचा ताफा सज्ज झाल्याची माहिती मिळाली आहे.
गौतमी पाटील हे नाव सध्या चांगलंच चर्चेत आहे. आपल्या तुफानी नृत्याने आणि सौंदर्याने गौतमी पाटीलने लोकांना अक्षरशः वेड लावलं आहे.’सबसे कातिल गौतमी पाटील’ हे वाक्य सध्या सतत कानावर पडत आहे .नृत्याच्या जोरावर गौतमी पाटील सध्या यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. नृत्यांगनेला पाहण्यासाठी गावोगावी लोकांची झूबंड उडत असते. असाच एक कार्यक्रम वणी शहरात होणारं आहे.गौतमीचा कार्यक्रम म्हणजे गर्दी, टाळ्या, शिट्ट्या, हुल्लडबाजी हे ठरलेलंच असते. यात नवल असं काहीही नाहीं.
याकरीता ॲड.कुणाल चोरडिया यांच्या अध्यक्षतेखाली उपाध्यक्ष मनिष गायकवाड,सचिव उमेश पोद्दार, सहसचिव संदिप बेसरकर,पियुष चव्हाण,राजु रिंगोले, शुभम मदान, मनिष गायकवाड,संघदिप भगत, प्रकाश तुरानकर, नंदकिशोर रासेकर, तौसिफ खान व कार्यकर्ते अहोरात्र कार्यक्रमाचा यशस्वितेसाठी प्रयत्न करीत आहे.