•चोरटयांनीच काढले सुविधा कापड व्यवसायिकाचे दिवाळे असा दाट संशय…
•शहरात चोरांना पोलिसांचा झाला अभय….
अजय कंडेवार,वणी :- शहरातील बाजार पेठेतील भीषण आगीत सुविधा कापड दुकान जळून खाक झाले. ही घटना मध्यरात्री दोन अडीच च्या दरम्यान घडल्याचा कयास आहे.ऐन सणासुदीच्या तोंडावर वणीतील मुख्य बाजार पेठेत असलेल्या प्रसिद्ध कापड शो रूम ला आग लागली की लावली ? त्यामुळे सुविधा कापड केंद्र या व्यावसायिकाचे मोठे नुकसान झाले. तसेच मोठी बाब ही की, गल्यातील रोख रक्कमही लंपास झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
या भीषण आगीने रौद्ररूप धारण केल्याने अग्निशमन दलाला पाचरण करण्यात आल्यानंतर आगी वर पहाटे पर्यंत नियंत्रण आणण्यात आले. आग एवढी भीषण होती की, कापड दुकानातील विविध माल जळून खाक झाल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे.
शोरूम मधील साडीचा कोट्यवधी रुपयांचा माल जळून खाक झाला असल्याचा अंदाज आहे.बाजूचे चिंडलीया कॉम्प्लेक्स मधून पाईपलाईन टाकून आग विझविण्यासाठी प्रयत्न केले आहे., त्यामध्ये असलेल्या भिंती पाडून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले आहे, कापड व्यवसायाची विक्री दिवाळीच्या पूर्वी फार मोठ्या प्रमाणात होते. पण त्या व्यवसायिकाचे दिवाळेच निघाल्याचे चित्र दिसून येत आहे.
विशेषता, वणी शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात चोरांना पोलिसांचे अभय निर्माण झाल्याचं स्पष्ट चित्र शहरात दिसून येत आहे.