Monday, August 10, 2026
HomeBreakingवणीतील मनोज वानखेडेचा खूनाची "थरार"कथा......

वणीतील मनोज वानखेडेचा खूनाची “थरार”कथा……

•प्रेमिकेच्या नवऱ्याचा” झाला रक्तरंजित अंत. •"करेक्ट कार्यक्रमानंतर" आरोपीची कबुली.

अजय कंडेवार वणी : प्रेमाच्या नावाखाली सुरू झालेला एक गुप्त संबंध शेवटी रक्तरंजित वळणावर पोहोचला!  वणी शहरात घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. विवाहित महिलेसोबत संबंध ठेवणाऱ्या तिच्याच प्रियकराने तिच्या पतीचा खून करून त्याचे प्रेत हौदात टाकल्याचा थरारक प्रकार मंगळवारी उघडकीस आला

मृत व्यक्ती मनोज गंगाधरराव वानखेडे (३५, रा. नवे वाघदरा) हा पेंटर म्हणून काम करत होता. कष्टकरी जीवन जगणाऱ्या या तरुणाचे संसारिक आयुष्य शांत होते.पण पत्नीच्या गुप्त नात्याने सर्व काही उलथापालथ केली.काही महिन्यांपूर्वी मनोजला पत्नीचे मोमिनपुरा येथील वाजिद हुसेन (३९) या युवकासोबत अनैतिक संबंध असल्याचे समजले. संतप्त मनोजने पत्नीला त्या नात्यातून बाहेर पडण्यास भाग पाडले. त्यानंतर १० जून रोजी पत्नीने वाजिदविरुद्ध ब्लॅकमेलिंगची तक्रार दिली. पोलिसांनी वाजिदला तुरुंगात पाठवले.

मात्र, तुरुंगातून सुटल्यावर वाजिदचा सूडाग्नी पेटला होता. मनोज माझ्या आड आला तर त्याचाच अंत करायचा,” असा निर्धार त्याने केला होता.१४ ऑक्टोबरच्या संध्याकाळी वाजिदने मनोजला साईनगरी भागात दारू पिण्यासाठी बोलावले. रात्रीच्या अंधारात,दारूच्या ग्लासामागे घडला एक भयंकर कट. वाजिद आणि त्याच्या तीन साथीदारांनी लोखंडी रॉडने मनोजच्या डोक्यावर वार केला. रक्ताचा फवारा उडाला, मनोज जमिनीवर कोसळला. त्यानंतर चाकूने भोसकून त्याचा खून करण्यात आला.खूनानंतर मृतदेह लपवण्यासाठी आरोपींनी मनोजचा देह कारमध्ये ठेवला आणि रात्रीच एमआयडीसीतील जी.एस. ऑईल मिल परिसरात नेऊन २० फूट खोल हौदात टाकून दिला.पण थरार इथेच संपला नाही, दुसऱ्याच क्षणी वाजिदने मनोजच्या पत्नीसमोर “तुझा नवरा कुठे गेला?”असा शोध घेण्याचा बनाव केला.पोलिसांना वाजिद आणि मृताची पत्नी यांच्या नात्याबाबत संशय आल्यावर त्याला चौकशीसाठी बोलावले. काही तासांनंतर वाजिदने अखेर कबुली दिली “हो, मीच मारलं मनोजला .संपूर्ण घटनाक्रम ऐकून पोलिसही थक्क झाले.या प्रकरणात वाजिद हुसेन आणि त्याचा साथीदार शुभम काशेट्टीवार यांना अटक झाली असून इतर तीन आरोपी फरार आहेत. मृताची पत्नीही या कटात सहभागी होती का ? याचा तपास पोलिस करत आहेत.या भयानक प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश दळवे व  प्रभारी ठाणे प्रमुख श्याम वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page